बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?,...तर जित कर हारने वालों को..
- Navnath Yewale
- Nov 15
- 2 min read

बिहार विधानसभेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मात्र, रात्री उशीरा अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला असून 89 जागांवर विजय त्यांनी मिळवला आहे. तर, त्यांचा मित्र पक्ष जेडीयू हा केवळ चार जागांनी त्यांच्या मागे आहे. जेडीयू ला 85 जागांवर विजय मिळवता आला आहे.
या निवडणुकीत विरोधी पक्षांचा सुफडासाफ झाला असून तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 25 तर, काँग्रेसला 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे भाजपसोबत असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाने देखील चांगले प्रदर्शन करत 19 जागांवर विजय मिळवला आहे.
दरम्यान, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भाजप नेते आणि नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रिपदाचे मुख्य दावेदार आहेत.
निवडणुकीत वाढलेल्या मतदानामुळे विरोधी पक्ष सत्तेत येईल, अशी चर्चा होती. मात्र, एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळत असल्याचे दिसत होते. त्याच प्रमाणे एनडीएने मोठा विजय मिळवला आहे. भाजप आणि नितीश कुमरांचा जेडीयू हे समान 101 जागांवर लढले होते. मात्र, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत त्यांनी 89 जागांवर विजय मिळवला आहे.
सर्वाधिक जागा मिळवणारा भाजप मतांच्या टक्केवारीत दुसर्या स्थानावर राहिला आहे. त्यांना 20.16 टक्के मतं मिळाली आहेत. तर नितीश कुमारांच्या जेडीयूला 19 टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेसला अवघी 8 टक्के मतं मिळाली असून ते सहा जागांवरच विजय मिळवू शकले आहेत.
तेजस्वी यादवांच्या पक्षाला सर्वाधिक मते:
बिहार निवडणुकीत पक्षनिहाय झालेल्या मतदानाची सरारी पाहता तेजस्वी यादव यांच्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे 22.85 टक्के मतदान झाले असून त्यांना केवळ 25 जागा जिंकता आल्या आहेत. मुस्लिम आणि यादव मतदार हा आरजेडीचा पाया आहे. मात्र, हा मतदार देखील फुटल्याने त्यांना मोठा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यन, एनडीएचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार निवडणुकीनंतर त्याचा नेता निवडतील. तोच नेता पुढचा मुख्यमंत्री असेल, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काही दिवसांपूर्वीच केलं. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार यांचा चेहरा जाहीर करणं टाळलं. यावरून बिहार निवडणुक निकालाचे संख्याबळ पाहता 243 पैकी एनडीएला 202 जागावंर विजय मिळाला आहे. त्यानुसार 89 जागांवर वर्चस्व मिळवणार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
त्याखालोखाल नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला 85 जागांवर यश मिळालं आहे. चिराग पासवान यांच्या लोजप ला 19 जागा मिळाल्या आहेत. याबंपर यशामुळे दुसर्या नंबरवर असलेल्या नितीश कुमार यांच्या जागा अधिक असल्या तरी भाजपच्या अभुपूर्व यशाने नितीश कुमार यांचे महत्व कमी झाल्याचे जानकार सांगतात. प्रत्यक्ष भाजप नितीश कुमार यांच्या शिवाय सरकार स्थापन करू शकते तसं झालं तर हार कर जितने वालोंको बाजीगर कहते है ही म्हण प्रचलीत असली तरी जितकर हारने वालोंको... याही म्हणीची रुढ पडायला वेळ लागणार नाही.



Comments