top of page

बीएमसीच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेना ठकारे गटाने एक जागा सोडावी, मनसेच्या बैठकीत सूर शिवसेना ठाकरे गटाला मिळणार तीन जागा, मनसेकडून एका जागेची मागणी

मुंबई: ठाकरेंच्या शिवेसनेच्या वाट्याला निवडून आलेल्या नगसेवकांमध्ये तीन स्वीकृत नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये देता येणार आहेत. यात तीन पैकी दोन नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एक नगरसेवक मनसेचा असावा असं मनसेच्या नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसेचा द्यावा, यासाठी मनसे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.


जागा वाटपावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा देऊन अगदी मोजक्या जागांवर मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी कुठलाही आग्रह मनसेने केला नाही किंवा जागा वाटपाच्यावेळी पेच निर्माण केला नाही. त्यामुळे कुठलाही आग्रह मनसेने केला नाही किंवा जागा वाटपाच्यावेळी पेच निर्माण केला नाही. त्यामुळे आता तरी ठाकरेंच्या शिवसेनेने तीन जागांपैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडवी, असं मत मनसेच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.


मनसे पक्षाला सत्ताधारी पक्षांचासुद्धा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत विविध पदावर निवडून आलेले सहा नगरसेवकांना संधी मिळावी त्यासोबत स्वीकृत नगरसेवक मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, अन्यथा इतर प्रस्तावांचा सुद्धा विचार केला जावा, असेही मत मनसेच्या बैठकीत मांडण्यात आले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आपल्या तीन स्वीकृत नगरसेवकापैकी एक स्वीकृत नगरसेवकांचे पद मनसेला देणार का? आणि तिन्हीही स्वीकृत नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेने दिले तर मनसे काही वेगळी भूमिका घेणार का? हे लवकरच समोर येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पहिल्यांदाच तब्बल 10 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहावर वाढवण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी किमान चार सदस्य भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच काँग्रेस देखील स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत.


मुंबई महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

भजाप-89, शिवसेना ठाकरे गट -65, शिवसेना शिंदे गट -29, काँग्रेस -24, मनसे-6, एमआयएम-8, राष्ट्रवादी (अ.प) -3, सपा-2, एनसीपी (श.प)- 1 असे आहे.

Comments


bottom of page