बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
- Navnath Yewale
- Sep 17
- 2 min read
बीड जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्नं पूर्णत्वास; शेकडो नागरिकांनी अनुभवला रेल्वे प्रवास, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नगरिकांची रेल्वेस्टेशनवर गर्दी

बीड: बहुचर्चीत आणि बहूप्रतिक्षीत अहिल्यानगर ते बीड-परळी रेल्वे मार्गाचा एकून 264 पैकी 133 किलोमिटर म्हणजेच अहिल्यानगर ते बीड पर्यंत चा टप्पा पूर्ण झाला. मराठवाडामुक्ती संग्रामदिनी बुधवारी (दि.17,सप्टेंबर) अहिल्यानगर ते बीड अशी रेल्वे धावल्याने बीड जिल्हावासीयांचे अनेक वर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे.
प्रत्येक बीडवासीयांसाठी हा आनंदाक्षण, या ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बीडजिल्हावासीयांनी ठिकठिकाणच्या स्टेशनवर हजारोंच्या सेख्यने पहिल्या रेल्वेचे जंगी स्वागत केले. तर आनेकांनी रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठावाडामुक्ती संग्राम दिनाच्या दुहेरी पर्वामध्ये पहिल्या रेल्वेस बीड येथे हिरवा झेंडा दाखवला.
गेल्या कित्तेक तपापासून बीड जिल्ह्याचा अंत्यत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे रेल्वे, बीडला रेल्वे आणण्यासाठी गेली कित्तेक वर्षापासून सामाजिक, राजकीयस्तरावरून प्रयत्न सुरू होते. या कालाची प्रत्यक्षात मुहूर्तमेढ रोवली ती लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे यांनी. दरम्यान, लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेच्या कामासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खासदार बजरंग सोनवणे यांनीही अल्पावधीत कामाला गती मिळविण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न केले.
प्रत्यक्षात काही शेकडो कोटींचा हा प्रकल्प हजारो कोटीपर्यंत गेला. सुरवातील 450 कोटींपासून या प्रकल्पाच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात निधी अभावी प्रकल्पाचे काम रेंगाळले. मात्र, केंद्र सरकार जेवढा निधी देईल तेवढाच राज्य सरकारही निधीचा वाटा उचलेल. असा ठराव झाल्यानंतर केंद्र सरकारने 24 हजार कोटी व राज्य सरकाने 24 हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी ठेवले त्यामुळे आज बीड जिल्हावासीयांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय ध्वजारोन केले. नियोजीत कार्यक्रमानुसार मराठवाडामुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे उद्घटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्याच्या सिंचनासह विविध विकासांवर प्रकाश टाकला.

मराठवाडामुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अशा दुहेरी परवणीचा योग जुळून या रेल्वे मार्गाचे उद्घाटन होत आहे. खर्या अर्थाने आज लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे यांचे स्वप्न साकर होत असल्याचे समाधान लाभत आहे. मराठवाड्याच्या या पिढीने जरी दुष्काळ पाहिला असला तरी पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाहीत, सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी मराठवाड्याचे हरवलेले 21 टीएमसी पाण्यापैकी 7 टीएमसी पाणी आष्टीमध्ये आणले आहे. पुढील काळात कृष्णा खोर्यासह, गोदावरी खोर्यामध्ये 51 टीएमसी पाणी आणण्याचा संकल्प आहे.
त्यामुळे येणार्या काळात मराठावाडा सुजलाम सुफलाम होणार आहे. रेल्वे येणे म्हणजे विकासगंगा अवतरणे होय, बीड जिल्हावासीयांसाठी आजचा क्षण हा विकास पर्वाचा असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.



Comments