top of page

बीड हादरलं: घरात बोलावून दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला, परळी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा

बीड: जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून, दरोडे, चोर्‍या मार्‍यांसह आता महिलांवरील अत्याचारातही वाढ होत असल्याचे चित्र आहे. घरात झोपलेल्या अल्पवयीन विवाहित महिलेस उचलून नेत तीच्यावर अत्याचार करून , गावातील चावढीत खांबाला बांधल्याची घटनेनंतर अवघ्या काही तासातच आज पुन्हा अल्पवयीन मुलीस गोड बोलून घरात बोलावून तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबत अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, दोन नराधमांनी गोड बोलावून घेत तीचे हात-पाय बांधत तोंडात कापडाचा बोळा कोंबून आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना रविवारी (15) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पिडितेच्या जबाबसह पालकांच्या फिर्यादिवरून परळी पोलिस ठाण्यात नराधमांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परळी तालुक्यातील धरावती तांडा येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस गोड बोलावून आपल्या घरात बोलावून घेतले. पिडिता घरात येताच एकाने दरवाजा बंद केला, ती ओरडू नये म्हणून दुसर्‍याने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला, तिचे हात-पाय बांधले. त्यानंतर असाह्य अल्पवयीन पिडेतेवर त्या दोन नराधमांनी क्रूरपणे आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.


अत्याचारानंतर पिडितेची सुटका करताना नराधमांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला संपवून टाकू असे म्हणत तिला दहशतीखाली ठेवले. धमकीमुळे प्रचंड घाबरलेल्या पिडितेने कशीबसी आपली सुटका करून घेत घर गाठले आणि घडलेला सर्व संतापजनक प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पालकांनी तत्काळ परळी पोलिस स्टेशन गाठून नराधमांच्या विरोधात फिर्याद दिली.


पालकांच्या फिर्यादीनुसार परळी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. फरार आरोपींच्या शोधात पोलिस पथक रवाना झाले आहे. अंबाजोगाई उपविभागिय पिंक पथकासह सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष जाधव घटनेचा तपास करीत आहेत.

Comments


bottom of page