बीडच्या झेडपीतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read
शिक्षणविभागात खळबळ यूडीआयडी कार्ड सादर न करणं भोवलं

बीड: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकर्या लाटल्याचे प्रकरण सध्या राज्यीरातील जिल्हापरिषदांमध्ये गाज आहेत. नागपूर, नांदेड, बीड जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यातच काल शिक्षकांनी संपाचा इशारा दिला होता. शिक्षक संपाच्या तयारीत असतानाच बीड जिल्हा परिषदेतील 14 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरीवर रुजू झालेल्या शिक्षक कर्मचार्यांना यूडीआयडी कार्ड सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. दरम्यान, युडीआयडी कार्ड तयार करण्यासाठी वारंवार मुदत देण्यात आली होती. त्यानुंसार शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. यूडीआयडी कार्ड सादर करण्याचे आदेश देवून, त्यासाठी वेळ देवूनही आदेशाची आंमलबजावणी न केल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने धडक कारवाई केली आहे. त्यानुसार 14 शिक्षकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश धडकताच एकच धावपळ सुरू झाली. काल शिक्षकांचा संप सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने अनेक शिक्षक कर्मचारी धास्तावले. तर काहींनी ही कारवाई कशामुळे झाली हे सांगताच अनेकांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, शिक्षण विभागाने यूडीआयडी कार्ड पडताळणी मोहिम राबवली आहे. त्यात प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यात आली. त्यासाठी यूडीआयडी कार्ड सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा शिक्षकांना स्मरण करूण देण्यात आले. नोटीस बजावण्यात आली. तरीही या 14 शिक्षकांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही. नोटीस देऊनही ते अनुपस्थित राहिले. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी या कार्यवाहीविषयी माहिती दिली, त्यानुसार, शिस्तभंगाची कारवाई अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे न सादर करणार्या संबंधित सर्व शिक्षकांवर विभागीय चौकशी सुरू केली जाणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील.
दरम्यान, प्रशासनाने ही प्रमाणपत्र बोगस नसल्याचे स्पष्ट केले, तर जी प्रमाणपत्र जुनी आहेत ती ऑनलाईन हवी आहेत. यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी शिक्षकांना 23 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही मुदत वाढवण्यात आली. विहित मुतदतीत युडीआयडी कार्ड सादर न केल्याने या शिक्षकांवार कारवाई करण्यात आली आहे. हे निलंबित शिक्षक दिव्यांग असतील, पण त्यांनी विहीत मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी:
सध्या बीड जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राआधारे नोकरी लाटली असेल तर त्यांची पडताळणी मोहिम सुरू आहे. त्या अंतर्गत 400 जणांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी यूडीआयडी कार्डची मागणी करण्यात येत आहे. जर कोणी असं बोगस प्रमाणपत्र सादर केलं असेल तर 2026 च्या दिव्यांग कायद्यानुसार, त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
निलंबीत शिक्षक
संपत्ती जाधव, रवींद्र धोंडीबा, सहशिक्षक जि.प.प्रा.शा हातगाव (ता.केज), उषा विठ्ठल माने सहशिक्षक जि.प.शाळा चौसाळा , संपत्ती भोसले, रामचंद्र छत्रगुण सहशिक्षक जि.प.शाळा चौसाळा, कल्पान गेणू चोपडे सहशिक्षक जि.प. प्रा. शाळा डोईठाण (ता. आष्टी), हेमंत कारभारी शिनगारे सहशिक्षक जि.प.प्रा.शा. मोरेवाडी (ता. अंबाजोगाई), संजीवणी विक्रम कंठाळे सहशिक्षक जि.प.प्रा.शा.रायमोहा (ता. शिरुर का.), सय्यद नवाज मौलासाहेब सहशिक्षक जि.प.प्रा.शा. राधाकृष्ण नगर सिरसाळा (ता.परळी), अंजली मारोतीराव मुंडे सहशिक्षक जि.प.प्रा. शा. गवळीवस्ती (बीड), शैला साहेबराव देवगुडे सहशिक्षक गांधीनगर मराठी (बीड), मनेाज नरसिंगराव सुर्यवंशी सहशिक्षक जि.प.प्रा.शा. जोडवाडी (उजन केंद्र ता. अंबाजोगाई), आश्रुबा विश्वनाथ भोसले सहशिक्षक जि.प.प्रा.शा. येळंबघाट (बीड), सिद्धू असाराम वाटमांड सहशिक्षक जि.प.प्रा.शा. भोपाळेवस्ती (ता. पाटोदा), प्रकाश बलभीम भोसले सहशिक्षक जि.प.प्रा.शा. पिठी (ता. पाटोदा), सुनंदा धोंडोबा बहिर सहशिक्षक जि.प.के.प्रा.शा. कुसळंब (ता.पाटोदा)



Comments