top of page

बीडमध्ये चाललंय काय?: क्रूर हत्येनंतरही ‘गुन्हेगारी प्रवृत्ती’ कुटुंबीयांची पाठ सोडेना!

दिवंगत महादेव मुंडेच्या अल्पवयीन मुलास मारहाणीच्या काही तासानंतर; संतोष देशमुख यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

बीड: मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भस्मासूराने हैदोस घातल्याचे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. परळी येथील व्यापारी महादवे मुंडे यांच्या क्रूर हत्येचा तपास सुरू असताना काल त्यांच्या अल्पवयीन मुलास शिकवणीहून परतत असताना एकाने मारहाण केल्याचा प्रकाराला काही तास उलटताच आज पुन्हा दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना सोशल मिडियावरुन अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमकीचा प्रकार समोर आला आहे.


निर्घुन हत्ये नंतरही न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना लोकशाहीत ‘कायद्याच्या राज्यात’ गुन्हेगरी प्रवृत्ती छळवत असेल तर जिल्ह्यात चाललंय तरी काय? कायद्याचा धाक उरलाय? असे अनेक प्रश्न सामान्य जिल्हावासीयांना पडणं सहाजीक आहे.


परळीतील व्यापारी दिवंगत महादेव मुंडे यांच्या अल्पवयीन मुलास शिकवणीवरुन परतत असताना अज्ञाताने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी याप्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे धाव घेऊन वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांसह त्याच्या टोळीकडून जिवीतास धोका असून संरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. याप्रकरणाच्या काही तासानंतर मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना राहुल फड नामक व्यक्तीने सोशल मिडियावर अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली आहे.


धनंजय देशमुख यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळे मागील सहा महिन्यात तीनवेळा गावात येऊन गेला, तसी तपास यंत्रणेला आपण माहिती दिली होती. चौदा महिन्या नंतरही कृष्णा अंधळे तपास यंत्रणेच्या हाती लागत नाही. त्याच्या फरार होण्यामागे तत्कालीन केज आणि धारुर पोलिसातील काही कर्मचारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. कृष्णा आंधळे याच्या पासून कुटुंबीयांच्या जीवीत्वास धोका असल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले होते.


राहुल फड नामक व्यक्तीने धनंजय देशमुख यांना सोशल मिडियावर पोस्टद्वारे अश्लिल भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीचा प्रकार समोर आला आहे. धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरुन केज पोलिसांत राहुल फड याच्या विरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला असून केज पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comments


bottom of page