बीडमध्ये भाजपच्या सरपंच पतीची आत्महत्या
- Navnath Yewale
- 15 hours ago
- 1 min read

बीड: बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच पतीने सोमवारी (दि.23) शेतातील झाडला गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील हातोला येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा माजी पंचायत समिती सदस्य महिला सरपंच पती बाबासाहेब गर्जे यांनी सोमवारी (दि.23) आष्टी येथे रहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सरपंचपतीने हे टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बाबासाहेब गर्जे हे आपल्या कुटुंबासह आष्टी-शेकापूर रस्त्यावर असलेल्या घरात राहत होते.
रविवारी गर्जे हे रोजच्या प्रमाणे आपली दैनंदिन कामे आटोपून घराबाहेर पडले होते. सायंकाळी ते आपल्या घराजवळ असलेल्या शेतात गेले. मात्र,बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने त्यांचे कुटुंबिय त्यांना बोलावण्यासाठी शेतात गेले. तेव्हा समोरचे दृष्य पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बाबासाहेब गर्जे यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकारची माहिती मिळताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्जे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर आली आहे. आष्टी पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी या हातोला गावच्या विद्यमान सरंपच आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्जे यांनी नेमकी आत्महत्या का केली? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी गर्जे यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.



Comments