महादेव मुंडे यांच्या मुलास अज्ञाताकडून मारहाण परळी पोलिसात गुन्हा दाखल, ज्ञाणेश्वरी मुंडे यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 1 min read

बीड: बीडच्या परळीत दोन वर्षापूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या निर्घुन हत्येचा सध्या एसआयटी मार्फतचा तपास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणात नुकतीच काही संशयितांची नार्कोटेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असताना त्याला मारहाण करण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षापूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली, या तपासत सध्या एसआयटीकडून सुरू आहे. या प्रकरणात काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरु असतानाच गुरूवारी (दि.19) महादवे मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला मारहाणीची घटना समोर आली आहे. गुरूवारी (दि.19) प्रणव सोमेश्वर नगर परिसरातील अभ्यासिकेत जात होता, याचदरम्यान प्रणवला एका व्यक्तीने मारहाण केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याघटनेनंतर अता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. ज्यामध्ये आपल्याला वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्रीगणेश कराड तसेच त्यांच्या टोळीकडून धोका असल्याचे म्हटले आहे.
प्रणव मुंडे मारहाणीनंतर दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी शुक्रवारी (दि.20) यांनी आपल्या मुलांसह कुटुंबाला वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्रीगणेश कराड तसेच त्यांच्या टोळीकडून धोका असल्याचं निवेदन पोलिस अधीक्ष नवनीत कॉवत यांना दिलं आहे. या घटनेमुळे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेच्या हाती काही लागलय का? आणि यामुळेच या सर्व घडामोडी घडतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रणव यास मारहाण प्रकरणी परळी पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



Comments