top of page

बीडमध्ये राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आमदार प्रकाश सोळंकेचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

ree

बीड : आमदार प्रकाश सोळंके यांनी आ. धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या परभावासाठी धनंज मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे.


बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव करण्यासाठी माझ्या विरोधकांसोबत बैठका घेत असल्याचा मोठा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे.


मुंडेच्या फार्म हाऊसवर बैठका

धनंजय मुंडे यांनी परळीतील नाथरा गावातील फार्म हाऊसवर प्लॅन आखल्याचा आरोप सोळंकेंनी केला आहे. मात्र, प्रकाश साळंकेचे आरोप बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडेच्या फॉर्म हाऊसवरील बैठकीस आम्ही होतो. त्या बैठकीत प्रकाश सोळंकेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पोटभरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर या राजकीय आरोप प्रत्यारोपात नवनाथ वाघमारे यांनी देखील उडी घेतली आहे. प्रकाश सोळंके हे ओबीसींचा द्वेष करतात, तसंच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची टीकाही वाघमारे यांनी केली. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराडवरून सोळंकेंनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं.


दरम्यान, यानंतर आता पुन्हा एकदा प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेवर आरोपांची राळ उठवली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंकेच्या या वादानंतर अजित पवार कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या स्वत:च्या पक्षातील सहकारी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे माझा पराभव करण्यासाठी विरोधकांसोबत गुप्त रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांना हरवण्यासाठी बैठका घेत आहेत. परळीतील नाथ्रा गावातील फार्महाऊसवर प्लॅन तयार झाल्याचा आरोपही प्रकाश सोळंके यांनी केल्याने बीडमध्ये राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Comments


bottom of page