बीडमध्ये ‘सैराट’ प्रेमप्रकरणातून भावी अभियंत्याचा खून
- Navnath Yewale
- Jul 20
- 2 min read

हत्येच्या घटनेने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. प्रेम प्रकरणातून इंजिनियरिंगचे शिक्षण घेणार्या 21 वर्षीय तरुणाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचाा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या 21 वर्षीय तरुणाचे नाव शिवम चिकणे असं आहे. 18 जूलै रोजी शिवम चिकणे याला रस्त्यात आडवून पाच जणांनी बेदम मारहाण केली होती. शिवम याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.
गेवाराई तालुक्यातील गंगावाडी येथील 21 वर्षीय शिवम चिकणे या तरुणाला प्रेमसंबंधाच्या कारणावरुन पाच जणांनी बेदम मारहाण केली होती. ही घटना 18 जूलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तलवाडा रस्त्यावर घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवम याच्यावर संभाजीनगरमध्ये एका रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तलवाडा पोलिस ठाण्यात आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार आहे.
शिवमचे वडील काशिनाथ चिमणे यांच्या फिर्यादीवरुन , मुलगा शिवम हा माजलगाव येथे अभियांत्रीकीचे शिक्षण घेत आहे. शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. 15 जूलै रोजी प्रेयसी एकटी असताना तिने शिवमला घरी बोलावले होते. त्यावेळी तिचे दोन नातेवाईक शिवम गणेश यादव आणि सत्यम मांगले हे तिथे आले व त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
गावकर्यांनी तो सोडवलाही होता. 18 जूलै रोजी दुपारी 12:30 वाजता काशीनाथ चिकणे शेतात असताना त्यांना मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ गेवराई येथील खासगी रुग्णालयात पोहोचले असता, शिवम बेशुद्धावस्थेत आढळला. ज्ञाणदेव चिकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजता शिवम दुचाकीवरुन जात असताना शिवम गणेश यादव याने त्याची गाडी आडवून शिवीगाळ केली. त्यावेळी गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव हे ही तिथे आले. शिवम यादव, सत्यम मांगले आणि राजाभाऊ यादव यांनी लाठ्या काठ्यांनी तर गणेश सुखदेव यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव यांनी हाता-बुक्यांनी मारहाण केली होती. जखमी शिवमवर रुग्णालयात उपचा सुरू होते, परंतु शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.



Comments