भगवद्गीता आण नाट्यशास्त्राला युनेस्कोचा सन्मान; पंतप्रधान मोदी म्हणाले हा ‘अभिमानाचा क्षण’
- Navnath Yewale
- Apr 18
- 2 min read
भगवद्गीता आणि भरत मुनि नाट्यशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांना युनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत स्थान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली आहे.

भगवद्गीता आणि भरत मुनि यांच्या नाट्यशास्त्र हे स्थान मिळणे हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचे जागतिक स्तरावर मान्यतेचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद्भगवद्गीता आणि भरत मुनिंचे नाट्याशास्त्र समाविष्ट झाल्याची माहिती मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
त्यांच्या सोशल मिडीया पोस्टमध्ये आहे की, “ हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्याशास्त्राचा समावेश करणे ही आपल्या शाश्वत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक मान्यता आहे. गीता अणि नाट्याशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेचे पोषण केले आहे. त्याची अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहतात” असं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले , “ भारताच्या संस्कृतीच्या वारसासाठी हा एक ऐतिहासीक क्षण आहे. श्रीमद्भगवद्गीता भरत मुनिंचे नाट्यशास्त्र आता युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोरले गेले आहे. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञाणाचा आणि कलात्मक तेजाचा गौरव करतो असं त्यांनी म्हटलं आहे. भगवद्गीता आणि नाट्याशास्त्र या ग्रंथांना युनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत स्थान मिळालं असल्याचं बुधवारी (16 एप्रीलख) रोजी जाहिर झालं आहे.
हि नोंदणी सांस्कृतीक वारसा जतन करण्यासाठी आणि त्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी केली जाते. भगवद्गीता जी महाभारातातील एक भाग आहे. हे सातशे श्लोकांचे आध्यात्मीक आणि दर्शनिक ग्रंथ आहे. जे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादातून जीवन, कर्तव्य आणि मोक्ष यांचे मार्गदर्शन करते. दूसरीकडे नाट्याशास्त्र हे भरत मुनि यांनी संकल्पीत केलेला एक प्राचीण ग्रंथ आहे.
ज्यामध्ये नाट्य , नृत्य, संगित आणि रंगमंचाच्या नियमांचा उल्लेख आहे जे भारतीय कला आणि संस्कृतीचा पाया मानले जाते. ही नोंदणी युनेस्कोच्या जागतिक स्मृती कार्यक्रमांतर्गत झाली. ज्याचे उद्दीष्ठ सांस्कृती आणि —ऐतिहासीक दस्तऐवजांचे संरक्षण आणि प्रसार करणे आहे. या यादीत आता भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांच्यासह जगभरातील 432 दतस्तऐवजांचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये भाराताचे योगदान आता अधिक ठळक झाले आहे.
Comments