भाजप कार्यकर्त्यांनी स्वपक्षाच्या मंत्र्याची गाडी आडवली ,छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) युतीवरून राडा; मंत्री अतुल सावेंची युतीची घोषणा, युती तोडा युती तोडा ची कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
- Navnath Yewale
- Jan 20
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये स्वबळावर लढल्यानंतर भाजप आता सत्ता स्थापन करणार आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जागावाटपावर रस्सीखेच सुरू झाली आहे. पण, अखेरीस आज दोन्ही पक्षांकडून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे मंत्री अतुल सावेंनी युतीची घोषणा केली.
पण, संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी युती तोडा, युती तोडा अशी घोषणाबाजी करत सावेंची गाडी अडवली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक अखेरीस पार पडली. दिवसभारापासून जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेरीस संध्याकाळी जागावाटपाची घोषणा करण्यात आली. भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा केली.
युतीच्या घोषणेनंतर अतुल सावे आपल्या वाहनातून निघाले असता त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या कार्यकर्त्यांनी युती तोडा, युती तोडा, अशी घोषणाबाजी करत घेरावा घातला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजपच्या आमदार, खासदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच गाडी आडवली.
त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ उडाला होता. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केल्याचे माहिती आहे. दरम्यान, आनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करत होतो. मात्र ती जागा शिवेसनेला गेली आहे आणि तेही भाजपच्या नेत्यांना शिव्या देणार्या व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.



Comments