भाजप निवडणूक आयोग खिश्यात घालून फिरतय का?- नाना पटोलेंचा घणाघात

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीवरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीचे तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपने लोकशाहीची हत्या केली असून, निवडणूक अयोगाला ते खिशात घेऊन फिरत आहेत का?” असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले आहे केी, भाजपने उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जो डाव खेळला आहे, तो अत्यंत खालच्या पातळीचा आहे. “ पोलिसांचा दबाव वापरून आणि पैशांच्या मोठ्या ऑफर्स देऊन विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. असे प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत याआधी कधीच घडले नव्हते,
“ सुरुवातील निवडणुक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे संकेत दिले. मात्र, अचानक आयोगाने आपला निर्णय बदलला आणि यू-टर्न घेतला. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
पाटोले पुढे बोलताना म्हणाले की, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकशाही मान्य नाहीत, “ जेव्हा सत्तेचा वापर करून निवडणुका मॅनेज केल्या जातात, तेव्हा लोशाही खर्या अर्थाने धोक्यात येते. निवडणूक अयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाईची मागणीही नाना पटोले यांनी केली.



Comments