top of page

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे शब्द शिंदे सेनेच्या जिव्हारी; दुसर्‍या पक्षात गेल्यावर ती वेश्या हे असं बोलणं म्हणजे..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीबद्दल जे सरचं काम सुरू झालं आहे. त्यासह खासदार, आमदार फुटीवर राज ठाकरे यांनी परखड शब्दात मत मांडलं. राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, “ प्रश्न विकत घेणार्‍यांचा नाहीय, विकले जाणार्‍यांचा आहे. देहविक्रीला समाज हे तयारच असतील, तर गिर्‍हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे ” त्याला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले ‘ राज ठाकरे यांनी काल कोणत्या आधारावर वक्तव्य केलं ते कळायला अर्थ नाही.’ “ तुमच्या पक्षात असेल तर वाघ आणि दुसरीकडे गेल्यावर ती वेश्या असं स्टेटमेंट करणं गैर आहे.


पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुमचं सर्व सहन करावं असा करार केलेला आहे का? पक्ष श्रेष्टी वेळ देत नाहीत, दबुनच रहायचं काय? तुम्ही गद्दार, खोके घेतले म्हणतात. मात्र तुम्ही तुमच्याकडे कार्यकर्ते ठेवण्यात अपयशी ठरलात. भापची भूमिका काय येत्या काळात ठरेल” असं उत्तर संयज शिरसाट यांनी दिलं.


दरम्यान, खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्या परस्पर विधानांवर संजय शिरसाट म्हणाले ” अमोल कोल्हे हे नेता आहेत, प्रवक्ते आहेत निश्चितच त्याला कुणीतरी सांगितले असेल. याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले असेल, रोहित बोलतो ते पवारांचे मत असते. उलटी भूमिका घेणं हे पवारांचं नेहमीचच आहे. ऑफर आली तर जायचे हे ठरलेले आहे. रोहित पवार पेक्षा अमोल कोल्हेंचे मत महत्वाचे आहे. बदलाचे वारे जेव्हा वाहतात तेव्हा अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जातात”. उद्धव ठाकरे यांना आम्ही कधीही म्हटलेलं नाही की, तुम्ही एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारा असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

bottom of page