भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीलादिवाळी सणात चर्चेला उधान
- Navnath Yewale
- 2d
- 1 min read

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिवाळी भेटीची मोठी बातमी समोर आली आहे., ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना आज शरद पवार यांचे निवासस्थानी सिलव्हर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. या भेटीदरम्यान प्रसाद लाड यांनी शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांना लाड कुटुंबाच्यावतीने दीपावलीच्या मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच “ मी आजोबा झालो, माझ्या मुलीला मुलगा झाला” ही आनंदाची बातमी देखील त्यांनी यावेळीपवार यांना सांगितली.
दरम्यान दुसरीकडे राज्यात सध्या दिवाळीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुका कशा लढणार युतीमध्ये की स्वबळावर हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान आता महायुतीचं चित्र हळुहळु स्पष्ट होताना दिसत आहे, समोर आलेल्या माहितीनुसार जिथे-जिथे विराोधकांना फायदा होणार आहे, तिथे-तिथे विरोधकांना फायदा होणार आहे, तिथ-तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका भाजप, राष्ट्रपती आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र लढणार आहेत, तर काही ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी या निवडणुकांना कसं समोर जाणार? हे अजूनही अस्पष्ट आहे.



Comments