भाजपमध्ये इनकमिंग सुरूच ; संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, गोपनियतेत उरकला पक्षप्रवेश
- Navnath Yewale
- Nov 23
- 1 min read

छ. संभाजीनगर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. नेते, पदाधिकार्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, यामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा सर्व पक्षातील पदाधिकार्यांचा समोवश आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार देखील घालण्यात आला होता. मात्र, हे नाराजी नाट्य सुरू असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. शहरात शिवसेना शिंदे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत शिल्पा वाडकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे. शिल्पा वाडकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता, त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. शिल्पा वाडकर यांचा प्रवेश सोहळा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असल्यानं आता शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीनंतर देखील भाजपात प्रवेश सुरूच आहेत. आतापर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिाकर्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता, तर शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.



Comments