भाजपाने भाकरी फिरवली; आशिष शेलारांकडून अध्यक्षपद काढल, अमित साटम यांच्यावर सोपवली जबाबदारी
- Navnath Yewale
- 7 days ago
- 1 min read

महाराष्ट्रातील आगामी सथानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पार्टीने मुंबईमध्ये खांदेपालट केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाने आपल्या नव्या मुंबई अध्यक्षांची घोषणा केली आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबईचं अध्यक्षपद भूषवणार्या अशिष शेलार यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं असून नव्या चेहर्याला संधी देण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या अध्यक्षपदावर भाजपाने अमित साटम यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवी शाल खांद्यावर टाकत साटम यांच्याकडे ही नवी जबाबदारी सुपूर्द केली. साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडूण गेले आहेत. त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. यामुळे भाजप नेतृत्वाने त्यांच्या खांद्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित साटम यांचे कौतुक करत नवे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमित साटम यांचा प्रवास
अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी असून ऑक्टोबर 2014 पासून ते सलग तिसर्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य ( आमदार) म्हणून काम करत आहेत. 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ( कार्मिक) ची पदवी घेतली, 2000 मध्ये पदवी प्राप्त केली.
Comments