top of page

भारत- पाकिस्तान युद्धाची तारीख ठरली! सायरन अलर्ट नंतर पूर्ण लाईट जाणार; पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन


ree

भारत - पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं. त्याला आता पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे.

पकिस्तानच्या पापाचा घडा भरला आहे. पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठीचं आता भारतानं कंबर कसली आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरवात 7 मे रोजी होणार आहे.


देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. यात एअर स्ट्राईक अलर्ट सायरन, कॅ्रश ब्लॅक आऊटसह विशेष प्रशिक्षण दिलं जातं. पंजाबच्या फिरोजपूरमध्ये रविवारी रात्री 9 ते 9:30 या वेळेत कॅ्रश ब्लॅक आऊटचं मॉक ड्रिल करण्यात आलं. यामुळं शत्रुच्या विमानांना रात्रीच्या वेळी मानवी वस्तीचं लोकेशन कळण्यास अडचणी येतात. खरं तर 1971 साली भारत- पाकिस्तान युद्धावेळी अशा प्रकारे सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल घेण्यात आलं होतं. त्याला आता पाच दशकांहून अधिक काळ लोटला आहे.


देशभरात 7 मे रोजी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल तुम्ही काय करायचं?

हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर (एअर रेड) सायरन अलर्ट, विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण द्या, यद्धस्थितीत स्वसंरक्षण करण्याचं प्रशिक्षण द्या, आणीबाणीच्या परिस्थितीत ‘कॅ्रश ब्लॅक आऊट’, शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद करावं, महत्वाची ठिकाणं, अस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करा.


नागरिकांना सहकार्याचे आवाहन

7 मे ला देशभरात सिव्हिल डिफेन्सचं मॉक ड्रिल करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर मोठा निर्णय आहे. एअर रेड सायरन्सची चाचणी केली जाणार आहे. सर्वसामान्य, विद्यार्थी संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सरकारकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले आहे.


पहलगाम हल्ल्यात 26 निष्पापांचा बळी.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पापांचा बळी गेला आहे. या हल्ल्यांच उत्तर आजवरचं सार्वत मोठं उत्तर असेल. हे भारताने स्पष्ट केलं आहे. तणावाच्या पार्श्वभूमिवर सध्या भारत पाकमध्ये शाब्दिक आणि राजकीय वॉर रंगलं आहे. आजवरच्या कारवायांमधून भारताने पाकचे दात नेहमीच घशात घातले, त्यामुळे आता देशवासीय वाट पहात आहेत पुढच्या स्ट्राईकची, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याची... त्याची भारतीय सैन्य ज्या प्रकारे तयारी करीत आहे त्यावरुन नक्कीच काही तरी मोठं होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

Comments


bottom of page