top of page

भारत फक्त एका व्यक्तीचा नसून, सर्वांचा आहे - आरएसएस प्रमुख मोहण भागवत


सोनपरी (छत्तीगड): देशात स्थलांतरितांवर वाढत्या हल्ल्यानंतर आणि अलिकडेच देहरादूनमध्ये त्रिपुरा येथील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. वांशिक हल्ल्यात आपला जीव गमावलेल्या विद्यार्थ्याच्या प्रकरणानंतर, भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की भारत कोणत्याही एका वर्गाचा किंवा समुदारयाचा नाही, तर तो प्रत्येक भारतीयाचा आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या जाती, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीच्या आधारे कोणाचाही न्याय करू नका, असे आवाहन केले.


छत्तीगडमधील सोनपरी गावात एका कार्यक्रमास संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले की, “ जाती, संपत्ती, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारे कोणाचाही न्याय करू नका. प्रत्येक व्यक्तीला आपले समजा. संपूर्ण भारत माझा आहे आणि मी संपूर्ण भारताचा आहे.” त्यांच्या विधानाकडे दशेातील सामाजिक सौहार्दाबाबत स्पष्ट संदेश म्हणून पाहिले जात आहे.


त्रिपुरा विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे आणि कुटुंबाच्या आरोपामुळे ही संपूर्ण घटना देहरादूनमधील दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर घडली, ज्यामध्ये एमबीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी एंजल चकमाचा मृत्यू झाला. 17 दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 26 डिसेंबर रोजी एंजलला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या वडिलांचा आरोप आहे की, एंजल त्याच्या धाकट्या भावाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता, ज्याला वांशिक शिवीगाळ केली जात होती आणि त्याला “ चिनी” म्हटले जात होते. जेव्हा एंजलने आपली भारतीय ओळख सांगितली. तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार आणि बोथट शस्त्रांनी हल्ला केला.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, सामाजिक सौहार्दाची पहिली अट म्हणजे मनातील भेदभाव आणि वेगळेपणाची भावना दूर करणे. जोपर्यंत आपण एकमेकांना समान मानत नाही, तोपर्यंत समाजात खरी एकता साध्य होऊ शकत नाही यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या मते “ संपूर्ण देश सर्वांचा आहे आणि ही विचारसरणी खर्‍या सामाजिक सौहार्दाचा पाया आहे.”


सार्वजनिक आणि धार्मिक ठिकाणी समानता मोहन भागवत म्हणाले की, सार्वजनिक सुविधा आणि धार्मिक स्थळे सार्वांसाठी खुली असली पाहिजेत. कोणत्याही प्रकारच भेदभाव केवळ समाजाला कमकुवत करत नाही तर संघर्षालाही जन्म देतो. त्यांनी ते संघर्षाचे नव्हे तर एकतेचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की समान संधी ही मजबूत लोकशाहीची ओळख आहे.


दरम्यान मोहन भागवत यांचे विधान केवळ एका घटनेपुरते मर्यादित नाही; ते संपूर्ण देशाला आठवण करून देते की, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आणि परस्पर आदरात आहे. जाती, भाषा किंवा प्रदेशावर आधारित विभाजन नव्हे तर केवळ एकताच या देशाला पुढे घेऊन जाऊ शकते.

Comments


bottom of page