भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ साठी पाकिस्तानातील ही नऊ ठिकाणेच का निवडली?
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

पहलगाम हल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी भारताने 7 मे मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान मधील एकून नऊ अतिरेकी ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. अझहर मसूद याच्यासह लष्कर-ए-तैयबा, जैश-ए- महम्मद या अतिरेकी संघनांचे कंबरडे मोडले. नेमकी हीख नऊ ठिकाण का निवडण्यात आली असा प्रश्न पडलाच असेल. चला जाणून घेऊयात का निवडली ही ठिकाणे, कशा पद्धतीने तिथ सुरू होतं अतिरेक्यांच ट्रेनिंग
भारताने पाकव्याप्त काश्मीर मधील मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिंबर, आणि सियालकोट, चक अमरु, मुरीदके, बहावलपूर अशा 9 ठिाकणी एअर स्ट्राईक केला. पण हीच 9 ठिकाणे का निवडली असा प्रश्न आहे. त्याचंच उत्तर आपण जाणून घेऊयात.
सियालकोट: सिायालकोट हा भारत आणि पाकिस्तान सिमेवरील दहशतीचा अड्डा आहे. या भागाला दहशतवादी हालचालींचे केंद्र असे म्हटले जाते. हे ठिकाण भारतातील जम्मू सीमेच्या जवळ आहे. त्यामुळे शस्त्र व अतिरेक्यांचे प्रवेशद्वार म्हणून महत्वाचे मानले जाते.
चक अमरू: दहशतवाद्यांना पंजाबमधून भारतात प्रवेशाचा मार्ग चक अमरू येथून आहे.शस्त्र व दहशतवादी भारतात पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे ठिकाण आहे. तसेच ड्रोन व स्मगलिंगद्वारे भारतात प्रवेशासाठी याचा वापर होत असल्याची माहिती होती. त्यामुळे एअर स्ट्राईकसाठी हे ठिकाण निवडण्यात आले होते.
भिंबर : दहशतवादी घुसखोरीसाठी भिंबर हे ठिकाण महत्वाचे आहे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन्समध्ये याठिकाणी अनेक हालचाली टिपल्या गेल्या होत्या. त्यामुळे दहशतवाद्यांच्या या ठिकाणावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.
कोटली: कोटली येथे दहशतवादी प्रशिक्षण शिबीर घेतले जाते. या भागाला नवे दहशतवादी घडवले जाणारा कारखाना असे ही म्हटले जाते. जैश, लष्कर व हिजबुल यांच्या संयुक्त कारवायांसाठी या ठिकाणाचा वापर करण्यात आला आहे. जंगल युद्धाचे प्रशिक्षण इथे दिले जाते. तसेच एलओसी जवळ वसलेले प्रशिक्षण केंद्र आहे.
मुजफ्फराबाद: पीओके मधील दहशतवादाचे केंद्र म्हणून मुजफ्फराबाद ओळखेले जाते. या ठिकाणी हिजबुलच्या कॅडरला प्रशिक्षण दिले जाते. हा घुसखोरीसाठी महत्वाचा मार्ग मानला जातो.
मुरीदके: मुरीदके येथे लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आहे. येथेच 26/11 च्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला होता.हे एक जमात- उद- दवाच्या नावाखाली चालणारे कट्टरवादी केंद्र आहे. लष्कर-ए- तैयबा इथून आर्थिक, धार्मिक आणि शस्त्रप्रशिक्षण मोहीमा चालवते. भारतात मोठ्या घातपाताच्या योजना याच ठिकाणाहून आखल्या जातात.
बहावलपूर : बहावलपूर हे मसूद असहरचा गड आहे. तसेच जैश-ए-महोम्मदचे सर्वात सक्रिय तळ आहे.पाठनकोट व पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार इथून सक्रिय होते. इथे मरदरसे, प्रशिक्षण केंद्रे आणि भरती मोहिम मोठ्या प्रमाणावर चालते.
गुलपूर : गुलपूर हे दहशवादी प्रक्षेपण स्थळ म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण भारतात शस्त्रास्त्रे व अतिरेकी घुसवण्यासाठी वापरले जाते. गुप्तचर अहवालानुसार, याठिकाणी दहशवाद्यांना एलओसी पार करण्यासाठी सज्ज ठेवले जाते.
Opmerkingen