भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळं वळण; व्हिडीओद्वारे मुलीने केला खुलासा
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

पुणे: जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. लग्नाची खरेदी करण्यासाठी आपल्या आई आणि भावासोबत गेलेल्या तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, तरुणीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्या तिखट टाकून दोन तरुणांनी तरुणीचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं. मात्र, या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे मुलीने स्वत: व्हिडीओ बनवून याबाबत माहिती दिली. माझे संबंधित मुलासोबत प्रेमसंबंंध आहेत, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आल्याचं मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितल्याने या घअनेत ट्विस्ट पाहायला मिळाला.
भिगवणमधून मुलीचे अहपरण करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली, त्यानुसार मुलगा आणि मुलगी दोघेही फोनवरती मेसेजवरती बोलत होते, त्यामुळे या घटनेत विविध तर्क वितर्क लावले जात होते. त्या तरूणीचं अपहरण झालं की प्रेमप्रकरण होतं,असा सवाल उपस्थित झाला होता. त्यातच आता तरुणीने स्वत: व्हिडीओ बनवून माझे अपहरण झाले नसल्याचं
स्पष्ट केले.
मुलीचा खुलासा
माझे आणि त्याचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध आहेत, त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती मला केली नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत निघून आले आहे, अशी माहिती मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून दिली. दरम्यान, मुलीकडून व्हिडीओ आल्यानंतर पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत. मात्र, अद्यापद यश आले नाही.



Comments