भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळे वळण ! तरुण-तरुणी बारामती शहर पोलिसात हजर; कुटुंबीयांचे आमदार राहुल कूलवर गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Feb 20
- 3 min read

भिगवण: येथील अपहरण प्रकरणातील तरुणीने सोशल मिडियावर व्हिडिओद्वारे खुलाशा नंतर ती रात्री बारामती पोलिसात हजर झाली. मुलासही हजर झालेल्या मुलीने पोलिसात जबाब दिला असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी मुलींच्या कुटुंबीयांसह हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामती कोर्टासमोर गर्दी केली. कुटुंबींयानी मुलीवर दबाव टाकून तिच्याकडून जबाब लिहून घेतल्याचं सांगत आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
भिगवण येथील एक 21 वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेली असता अझहर शेख याच्यासह इतरांनी डोळ्यात मिरची पुड टाकून दांडक्याने मारहाण करून तरुणीच शेजारी राहणार्या शेख अझहर व त्याच्या कुटुंबीयांनी अपहरण केल्याचा गुन्हा भिगवण पोलिसात दाखल करण्यात आला. मुलीच्या कुटुंबीयांकडून शेख अझहर यांने मुलीचे अपहरण केल आहे. तीला वडिल, चुलता (काका), आजोबा नसल्यामुळे तुझ्या आई आणि भावाला जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून जबाब घेतल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान,भिगवण पोलिसामध्ये शेख अझहर याच्यासह वडिल आणि भावावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीने स्वत: सोशल मिडियावर व्हिडीओद्वारे ‘ मी स्वत: अझहर याच्यासोबत आले आहे, मी भिगवण येथे बीए द्वितिय वर्षात शिक्षण घेत असून माझे आणि अझहरचे नऊ वर्षापासून प्रेम संबंध आहेत. मी माझ्या आईला आणि भावाला माझे लग्न त्याच्या सोबत लावून देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमच्या नात्यातीलच एका मुलासोबत 22 फेब्रूवारीला लग्न ठरवले. तुम्ही ठरवलेल्या मुलासोबत मी लग्न करणार नाही असं मी त्यांना सांगितलं होतं.
घटनेच्या दिवशी मीच माझ्या भावाच्या मोबाईल फोनवरुन अझहरला मॅसेज केला आणि त्यास बोलावून घेतले. आणि मी स्वयंपुर्तीने, माझ्या मर्जीने अझहर शेख सोबत आले आहे. माझ्या कुटुंबीयांनी मिरची पुड टाकून, दांडक्याने मारहाण करुण अपहरण केल्याचा आरोप खोटा असल्याचा व्हिडीओद्वारे खुलासा केला होता.
घटनेनंतर आमदार गोपिचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांनी हे ‘लव जिहाद’चं प्रकरण असून मुलीवर प्रचंड दबाव अणून तिला अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला. हिंदू संघटनांनी मोर्चाची तयारी केली होती मात्र, मुलीच्या व्हिडिओ मुळे आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजकीय पदाधिकारी, हिंदू संघटनांनी मुलीचा शोध घेवून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पण मुलीने व्हिडीओद्वारे केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
दरम्यान, घटनास्थळावरुन मुलागा आणि मुलीने अशोक लेलँड कंपनीच्या छोटा हत्ती या वाहनाने श्रीगोंदा, अहिल्यानगर, पुणे सासवड, सातारा, महाबळेश्वर मार्गे बारामती असा प्रवास केला. पोलिसांचा दबाव वाढत असल्याने अखेर गुरुवारी (दि.19) रात्री मुलागा आणि मुलगी दोघेही बारामती शहर पोलिसात हजर झाले.
मुलीने बारामती शहर पोलिसात आदल्या दिवशी व्हिडिओमधील खुलाशा प्रमाणचे लेखी जबाब नोंदवला. आज शुक्रवारी (दि.20) सकाळी बारामती न्यायालयात दोघांनाही हजर करण्यात आले. यावेळी मुलीच्या कुटुंबीय नातेवाईकांनी कार्टाबाहेर गर्दी केली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुलीची आई, नातेवाईकांनरी माध्यमांशी संवाद साधत आमच्या घरात पुरुष नसल्यामुळे मुलीवर बारा वर्षापासून त्यांचा दबाव आहे. काल व्हिडिओमध्ये एक आणि आज प्रत्यक्ष लेखी जाबाबत एक बोलते, तुझ्या आई आणि भावांना संपवून टाकू अशी धमकी त्यांनी दिल्यामुळे ती आरोपीच्या बाजूने जाबाब देत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला.
आमदार गोपिचंद पडळकर यांनी वडील नसलेल्या मुलींना एका विशिष्ट धर्मियांकडून टार्गेट केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला. या मुलीच्या घरात पुरुष नसल्यामुळे आरोपींनी ‘लव जिहाद’ यशस्वी करण्यासाठी मुलीवर दबाव आणला असून पोलिसांनी कुटूंबीयांची बाजू ऐकून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणीही आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली.
आमदार राहुल कूल यांच्यावर गंभीर आरोप : दरम्यान, दौंडचे आमदार राहुल कुल यांची आरोपीसोबत ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करत आमदार दौंड यांनी या प्रकरणात आरोपींना पाठबळ दिल्याचा आरोप कुटुंबीय, नातेवाईकांनी केला आहे.
मुलीच्या कुटुंबीयांचा इशारा : सबंधीत मुलगी आणि मुलास मा. न्यायालयातून बाहेर आणताना मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कायदासुव्यस्थेच्या अबाधित राखत तातडीने मुलाग आणि मुलीस सुरक्षीतस्थळी हलवले. दरम्यान, मुलीवर आरोपींचा प्रचंड दबाव आहे, तीचा लहान भाऊ आणि आईस जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती आरोपी सांगतील तसा जबाब देत असल्याचा आरोप करत आमची मुलगी आच्या ताब्यात द्या अन्यथा आम्ही इथेच आत्महत्या करु, असा इशारा मुलीच्या कुटुंबीयांनी दिला आहे.



Comments