top of page

भीषण दुष्काळाचं भयान वास्तव: बीडमध्ये उद्या ‘हवालदील’ शेतकरी, शेतमजूरांचा आक्रोश मोर्चा शिरुर- पाटोदा तालुक्यातून लाखो शेतकरी, शेतमजूरांसह दुष्काळाने प्रभावीत नागरीक सहभागी होणार

5 hours ago
2 min read

शिरुर कासार:सरकारने दुष्काळ जाहिर केेला असला तरी भीषण दुष्काळाचे वास्तव आणि हक्काच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी आमदार भिमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वात ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. शिरुर कासार, पाटोदा तालुक्यातून लाखो शेतकरी,शेतमजूरांसह दुष्काळाने प्रभावीत सामान्य नागरिक मोर्चात सहभागी होणार असून शिरुर कासार तालुक्यात सामान्य नगारीकांनीच नियोजन हाती घेतल्याने मोर्चाचा आक्रोश शासनदरबारी पोहोचणार आहे.


मागील वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीने पिकांसह जमिन खरडून गेली, जमिनीतील कसदार माती वाहून गेल्याने यंदा कपाळावर हात मारत बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पावसाच्या भरवश्यावर जूनमध्ये खरिपाची पेरणी केली. रिपरिप पावसावर माना धरलेली पिके तब्बल दीड महिन्याच्या पावसाच्या खंडामुळे करपून गेली. आधिच शेतीच्या सुपिकतेसाठी मशागतीने मेटाकूटीला आलेला शेतककरी, त्यात यंदा पावसाअभावी खरीपाचे उत्पादनही हिरावल्याने शेतकर्‍यांसमोर दुष्काळात जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने दुष्काळ जाहिर केेला असला तरी भीषण दुष्काळाचे वास्तव आणि हक्काच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी आमदार भिमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वात ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.


सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी रडल्या शिवाय आईचे लक्ष बाळाकडे जात नाही, त्याप्रमाणे दुष्काळी समस्यांवर मात करण्यासाठी शेतकरी शेतमजूरांना भरीव मदत, जनावरांसाठी चारा-पाणी, दुष्काळात रोजागाराच्या माध्यमातून हाताला काम आणि कष्टाला दाम, यासह मुलभूत गरजांसाठी प्रभावी उपाय योजनांसाठी हक्काच्या मागण्या घेवून लाखो शेतकरी, शेतमजूरांसह दुष्काळाने प्रभावी नागरिक माजी आमदार भिमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा कचेरीवर धडकणार आहेत. आष्टी-पाटोदा, शिरुर कासार विधानसभा मतदार संघातील समान्य नागरीक गाव-वाडी, वस्ती-तांड्यावरील शेतकरी, शेतमजूरांशी संवाद साधून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. माजी आमदार भिमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या कार्यकर्त्यांना सामान्य शेतकरी, शेतमजूरांची साथ मिळाल्याने उद्याच्या अभूतपुर्व ‘ जन आक्रोश मोर्चा ’ चे फलित पदरात पडणार यात शंका नाही.


राजकारणाच्या वलयातले मानवतेचे दूत:

सत्ताधारी पक्षात असताना माजी आमदार भिमराव धोंडे व माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी भीषण दुष्काळाचे भयान वास्तव शासन दरबारी मांडून संकटकाळात शेतकरी, शेतमजूरांसह दुष्काळाने प्रभावीत प्रत्येक घटकांना भारीव मदत, प्रभावी उपाय योजनांसाठी मानवतेचा धर्म पाळत राजकारणापलिकडे जाऊन शासना दरबारी शेतकर्‍यांचा मागण्या मांडण्याचे धारिष्ट केल्याने मोर्चात स्वयंपूर्तीने लाखो नागरीक सहभागी होणार आहेत.

Comments


bottom of page