भुजबळ फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मेंबर झाले- वडेट्टीवार
- Navnath Yewale
- Oct 18
- 1 min read

ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये काल मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भर सभेत जूना व्हिडीओ दाखवून सडकून टीका केली होती. भुजबळ यांच्या टीकेला वडेट्टीवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.
बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यातून अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, वडेट्टीवार यांचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास्थळावरील जूना व्हिडीओ दाखवत भुजबळ यांनी वडेट्टीवार ठाम नसल्याचे सांगत ओबीसी आरक्षणा बाबत वडेट्टीवार यांची भूमिका संशयास्पद असल्याने ते ओबीसींसाठी धोक्याचं असल्याचंही भुजबळ म्हणाले होते.
भुजबळ यांच्या टीकेला आज विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. वडेट्टीवार म्हणाले की, नागपूर मोर्चाची धास्ती घेवून भाजपने भुजबळांना मला टार्गेट करण्यासाठी सोडलं आहे. विषय नसताना काल मला टार्गे केलं कळत नाही. इकडं भुजबळ तर तिकडं जरांगे पाटील हे मला टार्गेट करत आहेत. दोन्ही बाजूने माझ्यावर टीका करतात यातच मी धन्यता मानतो दोघांचेही स्वागत करतो.
नागपूर मोर्चाची धास्ती घेवून भाजपने छगन भुजबळ यांना माझ्यावर टीका करण्यासाठी सोडलं आहे. मी विरोधी पक्षनेता असताना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिलेला जूना व्हिडिओ दाखवून मझ्यावर टीका करण्यात आली. मात्र, या व्हिडिओतील वास्तविकता तपासून पाहणं महत्वाचं आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी शिंदे समितीने मराठवाड्यात दोन हजार 600 कुणबी नोंदी शोधल्या होत्या त्या अणुषंगाने मी मराठवाड्यातील ज्या मराठ्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. ते ही आरक्षणाचे हक्कदार आहेत असंच म्हटलं होतं
आंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली होती ती मला पटली नाही, त्यामुळे राज्यातील इतर ओबीसींच्या सभेला गेलो नसल्याचा खुलासाही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.



Comments