top of page

भेंडवळच्या पाऊस, हवामान, राजकीय, आर्थिक भविष्यवाणीला अंनिसचे आव्हान, श्याम मानव म्हणाले 80 लाख रुपयांचे बक्षीस

Apr 20
2 min read

बुलढाणा : सध्या अशोक खरातसारख्या भोंदूबाबांमुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय चव्हाट्यावर आला असून अनेक भोंदूबाबांचे कारनामे समोर आले आहेत. याप्रकरणी. पोलिसांनी कारवाई करून भोंदूबाबांविरुद्ध गुन्हे देखील दाखल केले आहेत. एकीकडे भोंदूचा विषय चर्चेत असताना, गेल्या शेकडो वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षी पाऊसाचा अंदाज वर्तवला जातो. वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तविणारी बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक भेंडवळची घटमांडणी यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू झाली आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने भेंडवळच्या घटमांडणीला आव्हान दिलं आहे.


भेंडवळ, कुंडली आणि पारंपाकि ज्योतिषशास्त्राच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष शाम मानव यांनी खुले आव्हानच दिले आहे. “ 10 कुंडल्या आणि सध्याची माहिती देऊ, त्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक ठरवून दाखवा” असे आवाहन अंनिसकडून करण्यात आले असून, ते सिद्ध झाल्यास तब्बल 80 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात या अशा घटमांडणीचे कुठलेही अंदाज खरे ठरले नाहीत. त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकर्‍यांनी अशा घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलं आहे.


याबाबत शाम मानव यांनी म्हटले की, त्याच त्या गोष्टी वारंवार फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकर्‍यांनी अशा घट मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलं आहे. याबाबत शाम मानव यांनी म्हटले की, आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित असून त्या पडताळून पाहता येतात. मात्र, भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तितकी शास्त्रीय पडताळणी नसल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी शेतकरी अनुभवावर निर्णय घेत होते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी काही धार्मिक व पारंपारिक प्रथांवरही त्यांनी टीका केली. “ लोकांना फसवण्यासाठी श्रद्धेचा वापर होतो” असा आरोप करत अशा प्रथांविरोधात जागृतीची गरज असल्याचे मानव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक व धार्मिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


आज सकाळी झाली भविष्यवाणी : सुमारे 370 वर्षापासूनची असलेली भेेंडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. या घटमांडणीसाठी विदर्भासह खान्देश व मध्य प्रदेशातील शेतकरी हजेरी लावतात. सायंकाळी सूर्यास्तावेळी ही घट मांडणी करण्यात आली असून आज सकाळी घट मांडणीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. ते ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग गर्दी करत असतो. यंदा जागतिक युद्धजन्य परिस्थिती, इंधन तुटवडा, महागाई अशा विविध समस्यांमुळे भेंडवळच्या घटमांडणी व त्यातून वर्तवण्यात येणार्‍या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या घटमांडणीला चॅलेंज देत अनिसने 80 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 90 टक्क्यांपेक्षा जास्त भविष्यवाणी अचूक दाखवा, असेही त्यांनी म्हटले आहे.


घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्व कमी झालेलं नाही. भेडवळीची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकर्‍यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पिक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बर्‍याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असेल, तरी शेतकर्‍यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.

Comments


bottom of page