top of page

भोंदू खरातचा पुण्याच्या उद्योगपतील कोट्यावधींना गंडा

नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव, अवतापूजेच्या नावाखाली विदेश दौरे, उत्तरपूजेसाठी नवीन वास्तूसाठी कोट्यावधी उकळले

पुणे : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीत. त्याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्यानं एकाला कोट्यवधीचा गंडा घातला आहे. लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा खरातनेे विश्वासघात केला आहे.


जगाच्या पाठीवर 21 देशांत फिरून परिस शक्ती प्राप्त करून देण्याची बतावनी भोंदू खरात याने केली होती. याशिवाय नाग दंशाने मृत्यूची भीती दाखवून खरातनं राजेंद्र जासूद या व्यवसायिकाला एक दोन नव्हे तर तब्बल 4 ते 5 कोटींचा गंडा घातला होता. या फसवणुकीची तक्रार आता जासूद यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात दाखल केली आहे. खरातनं जासूद यांना कसं आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांची फसवणूक केली याचा उलगडा झाला आहे


पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांना लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवून देण्याचं आमिष दाखवून खरातनं जाळ्यात ओढलं. अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, अशी घालत सुरुवातील खरातनं 90 लाखांची मर्सिडीज कार जबरदस्तीनं स्वत:च्या नावावर करून घेतली. धक्कादायक म्हणजे, दि. 1 ऑक्टोबर 2018 रोजी मिगाव येथील मंदिरात पूजेदरम्यान प्लास्टिकच्या बनावट नागाचा वापर करून इशान्येश्वर महाराज आले असं सांगत नागदेवता प्रसन्न झाल्याचा बनाव त्यानं रचला होता.


नागदेवतेनं दर्शन दिलं आता पुढील 5 वर्षात 21 देशात जाऊन तिथल्या मातीला स्पर्श केल्यानंतरच परिस शक्ती प्राप्त होईल असं अमिष खरात यानं जासूद यांना दाखवलं. आणि अवतारपुजेसाठी म्यानमानर, ग्रीनलँड, अमेरिका, युगांडा, इजिप्त आणि बांगलादेश यांसह अनेक देशांचा प्रवास त्यानं जासूदच्या खर्चानं केला. डिसेंबर 2018 साली म्यानमार आणि त्यानंतर जुन-जूलै 2019 साली ग्रीणलँड देशात या भोंदूनं परदेशवारी केली. त्यानंतर अमेरिकेत घेऊन जाण्याचा आग्रह धरला. अमेरिकेतील एका रुग्णालयात जासूद यांनी 4 वेळा खरतावर महागडे उपचार केले. त्यासाठी एकून 29 लाख 81 हजार रुपये इतका खर्च बळजबरीनं करण्यास भाग पाडण्यात आलं होतं.


दरम्यान, ग्रीणलँडच्या हॉटेलमध्ये अतसाना कैलास मानसरोवरला स्वर्गाचं पहिलं टोक आणि ग्रीनलँडला स्वर्गाचं दुसरं टोक मानतात असं सांगून खरातनं फरशीवर झोपून स्वर्गात गेल्याचं नाटक केलं. आणि त्याचवेळी आपली फसवणूक होत असल्याचं जासूद यांच्या लक्षात आलं होतं. परदेश प्रवास तर झाला पण खरातची भूक संपत नव्हती. अवतारपुजेच्या नावाखाली परदेश प्रवास आणि अमेरिकेतील वैद्यकिय उपचार करून घेतल्यानंतर खरातनं जासूदला उत्तरपूजा कण्यास सांगितलं. आणि त्यासाठी नवी वास्तू पाहिजे असं म्हणत मिरगावातील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये उकळले.


मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामासाठी खरातनं जासूदकडून 1 कोटी 11 लाख रुपये वसूल केले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्थानमधून तब्बल 90 लाखांचं फर्निचर विकत घेण्यात आलं. त्यानंतर सागवानी लाकडामध्ये फर्निचर बनवून देण्यासाठी पुण्याच्या टिंबर मार्केटमधून 29 लाखांचं सागवानी लाकूड जबरदस्तीनं खरेदी करण्यास भाग पाडल्याचं तक्रारीत नमूद आहे. दरम्यान हे सर्व व्यवहार जासूद यांनी आरटीजीएस आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्याचं एकआयआरमधून समोर आलं आहे.


खरातकडून लुटलं गेल्याचं लक्षात आल्यानंतर जासूद यांनी त्याच्यावर खर्च केलेल्या पैशांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी खरातनं जासूद यांच्यावरच वावी पोलीस ठाण्यात 5 कोटींच्या खंडणीचा खोटा गुन्हादाखल केल्याचा अरोप जासूद यांनी केला आहे. एसआयटी आणि नाशिक पोलिसांकडून भोंदू खरातची कसून चौकशी सुरू आहे. शिवाय 5 कोटींच्या खंडणी प्रकरणाचाही समांतर तपास एसआयटीनं सुरू केला आहे. भोंदू खरातचे रोज नवनवीन समोर येणारे कारनामे धक्कादायक आहेत. आगामी काळात आणखीही धक्कादायक खुलासे हाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments


bottom of page