top of page

भोंदू बाबा खरात सोबतचा तो फोटो गुवाहाटीतीला! रुपाली चाकणकरांनी सांगितले फोटोचं सत्य

नाशिक: भोंदू अशोक खरात हा अनेक महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या अरोपाखाली तुरुंगात आहे. त्याच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार अशा सर्वच गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे खरातसोबत जवळचे संबंध असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना महिला आयेागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता नुकतेच चाकणकर, त्यांचे कुटुंबीय आणि खरात यांचा एक फोटो समोर आला आहे. चाकणकर यांनी खरातसोबत गुवाहाटीत देवीचे दर्शन घेतले, असे सांगितले जात आहे. त्यावर आता चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


खरातच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. याच चौकशीचा एक भाग म्हणून रुपाली चाकणकर यांनाही ईनीने चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर चाकणकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खरात आणि त्यांच्या समोर आलेल्या गुवाहाटीतील फोटोवर स्पष्टीकरण दिलं. गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे त्या फोटोमध्ये खरात आणि माझे कुटुंबीय आहेत. आम्ही खरातसोबत प्रवास केलेला नाही. खरात त्याच्या कुटुंबासोबत, अनेक ट्रस्टींसोबत गुवाहाटीला दर्शनाला पोहोचला होता, असे स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिले.


तसेच,यापूर्वी गुवाहाटीला माझ्या कुटुंबाने देवीचे दर्शन घेतलेले नव्हते. त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं तर छान होईल, असा अध्यात्मिक भाव ठेवून आम्ही स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून गेलो होतो. त्यानंतर गुवाहाटीत आम्ही सोबत देवीचं दर्शन घेतलं होतं, असेही चाकणकर म्हणाल्या.


खरातचा पुढचा प्रवास त्याच्या लोकांसोबत होता. खरात त्यावेळी अनेक लोकांसोबत, त्याच्या कुटुंबीयांसोबत तिथे आला होता.आपण अने ठिकाणी देवाच्या दर्शनाला जातो. गुवाहाटीतही आमचा तोच आध्यात्मिक भाव होता. अनेक क्षेत्रातील लोक त्याचे दर्शन घ्यायचे. त्याला गुरू मानायचे. तीच आमची भावना होती. त्याच्यावर आम्ही प्रामाणिक श्रद्धा ठेवली होती असही रुपाली चाकणकर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या.

Comments


bottom of page