top of page

भोंदू राजेंद्र गडगेकडे 200 व्हिडिओ, 10 बँक खाते, 13 मालमत्ता; पोलिस तपासात मोठा खुलासा

अहिल्यानगर: अनिंसच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल झालेला भोंदू राजेंद्र गडगे महाराज याच्याबाबत अहिल्यानगर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोंदगिरीच्या जोरावर त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमा केली असून, त्याची वेगवेगळी बँकांमध्ये दहा खाती सापडली आहे.


तसंच त्याच्याशी संबंधित 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. हे व्हिडिओ नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत, यावर पोलिसांनी अधिक खुलासा केलेला नाही. त्यामुळे भोंदू गडगे महाराजाभोवती अधिक संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.

राजेंद्र गडगे महाराज याने दत्तधाम सरकार, असे नाव धारण करून संगमनेरच्या वडगाव पान येथे धर्माच्या नावाखाली मोठं साम्राज्य उभं केलं होतं. कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरा करण्याचा दावा तो करत होता. पुत्र प्राप्ती करून देतो, असे दावा करत होता. दारू सोडवण्यापासून ते घरातील अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगून लोकांची फसवणूक करत होता.


या भोंदू राजेंद्र गडगे महाराज याचा गुरूवारी, रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी भरत होता. याविरोधात अंनिसची तक्रार होती. पोलिसांकउे अधिकार असून देखील कारवाई होत नव्हती. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई झाल्यानंतर राजेंद्र गडगेविरोधात कारवाई व्हावी यासाठी अंनिस मोठा पाठपपुरावा केला. यानंतर राजेंद्र गडगे याला संगमनेर पोलिसांनी अटक केली.


पोलिस कोठडीत असलेल्या राजेंद्र गडगेविरोधात आता गर्भधारण पूर्व और प्रसव पूर्व निदान तकनीक अधिनियमानुसार देखील गुन्हादाखल होणार आहे. पुत्र प्राप्ती प्रकरणी संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजेंद्र गडगे याला नोटीस बजावली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी राजेंद्र गडगेबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर आणली आहे. श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघमारे यांना याबाबत माहिती दिली.


200 पेक्षा जास्त व्हिडिओ जप्त : भोंदू राजेंद्र गडगे पोलिस कोठडीत असून, त्याच्याशी संबंधित 200 पेक्षा जास्त व्हिडिओ सापडले असून, ते केले आहेत. यासह त्याच्या दत्ताधाम आश्रमातून अनेक संशयास्पद औषध मिळाली आहेत. राजेंद्र गडगे याने संगमनेर तालुक्यात आणि परिसरात 13 मालमत्ता खरेदी केल्याचे तसेच वेगवेगळ्या दहा बँकांमध्ये राजेंद्र गडगे याची खाती आहेत. या सर्व चौकशीच्या फेर्‍यात असून, सर्व तपासणार आहोत, असे सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.


फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे: राजेंद्र गडगेसंबंधित सापडलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिककडून अहवाल मागवण्यात येणार आहे. राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम सरकारमध्ये 90 पेक्षा जास्त मेडिसीन सापडले आहेत, ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे अहवान पोलिसांनी केलं आहे.

Comments


bottom of page