मंगेश काळोखे हत्याप्रकरण; गोगावलेंनी हत्येचा राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडे बोट, संशयित राष्ट्रवादीच्या घारेंचा खळबळजनक दावा
- Navnath Yewale
- Dec 27, 2025
- 2 min read

खोपोली: रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी काळोखे यांच्या हत्येचा अरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर करताना या प्रकरणातील ज्यांची नावे समोर येत आहेत, त्यांच्यावर गुन्हा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तर या प्रकरणात घारे यांनी त्यांचे नाव समोर येताच आपली भूमिका स्पष्ट करताना आपला यात कोणताच संबंध नसल्याचे म्हटलं आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी देखील या प्रकरणाच संपूर्ण तपास व्हावा, योग्य कायदेशीर शिक्षा व्हावी अशीच आपल्या पक्षाची मागणी असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला त्यातूनच राजकीय सूडबुद्धीतून मंगेशची निर्घून हत्या झाल्याचा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दिवंगत नगरसेवक मंगेश हे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी पाच ते सहा लोकांनी त्यांच्यावर जबर हल्ला केला. त्यांना आयुष्यातून उठवलं. यामध्ये सुधाकर घारे आणि भगत हेत प्लॅनिंग मास्टर असल्याचा अरोपही यावेळी गोगावले यांनी केला आहे.
तसेच त्यांना मंगेश यांची ही नगरसेवक पदाची दुसरी टर्म असून आमदारकीच्या वेळी त्यांनी चांगलेच काम केलं यामुळेच आमची शीट खोपोलीत बसली. हीच गोष्ट त्यांच्या मारेकर्यांना खूपत होती. त्यातच नगर पालिकेच्या निवडणुकीत झालेला पराभवही जिव्हारी लागला आहे. यातूनच त्यांची हत्या झाली. जी राजकीय सूडबुद्धीतून झाल्याचंही मंत्री गोगावले यांनी म्हटलं आहे.
मारेकर्यांचे कर्ते करविते जे होते, ते येथे सभा घेवून गेले, जे दुसर्यावर शिंतोडे उडवत होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असा सवाल ही गोगावले यांनी केला. तर या प्रकरणात जे जे आरोपी आहेत. ज्यांची नावे समोर आली आहेत. यातील कोणीच सुटता कामा नये. यांना त्वरीत अटक व्हावी अशी मागणीही गोगावले यांनी केली.
या प्रकरणी सुधाकर घारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपण एका धार्मिक ठिकाणी असून आपण येथे खोटं बोलणार नाही. मी शपथ घेवून सांगतो की या घटनेत आपला कोणताच संबंध नाही. ज्याची हत्या झाली ते आपल्या नात्यातील होते. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवावा तितका कमी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यावेळी घारे यांनी,ही घटना घडल्यानंतर मी एक बातमी वाचली ज्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट आपले नावं घेतले. जे फक्त राजकीय स्वार्था पोटी केलं जातयं
पण आता यात असेही समोर येत आहे की माझ्यासह भग याचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला आहे. थोरवेंच्या भावाने आंदोलन करत हे केलं आहे. पण माझा पोलिस प्रशासन आणि न्याय देवतेवर विश्वास असून मी असं घाणेरडं काम करणार नाही. पण त्यांनी याबाबत योग्य चौकशी करून दोषींना समोर आणावं अशी मागणी आहे. तसेच या गुन्हात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही घारे यांनी केली आहे . जेव्हा पोलिस प्रशासनाला या प्रकरणात तपासाठी गरज असेल त्यावेळी हजर राहून मदत करेन. तर ज्या काळोखे कुटुंबावर हा दु:खाचा प्रसंग ओढावला त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.



Comments