मुख्यमंत्री फडणवीसांचे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे आदेश
- Navnath Yewale
- 4 days ago
- 3 min read
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली - सुषमा अंधारे
अंजली दमानियांचा संताप; पाताळातून शोधून काढा कारवाई करा

मुंबई/ पुणे : आज दिवसभर कॅप्टन अशोक खरात याचे वेगवेगळे कांड समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीनेही चकाणकर यांना माध्यमांसमोर सुनावले. त्यातच दुपारी रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समारे आली ‘ मी मुंबईत आहे, पोलिस महासंचालकांची भेट घेणार आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणनं मांडणार आहे ’ या प्रतिक्रियेनंतर अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला चाकणकर गेल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे येणार्या अवघ्या काही तासात रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार यावर आता शिक्का मोर्तब झाले आहे.
चाकणकर तंत्र-मंत्र विद्या करतात, सोमवती अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली :
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना तंत्र-मंत्र विद्या अवगत होती त्यांनी स्वत:ची अनामिकाही सोमवती अमवस्येला कापली होती. अशी माहिती एका पिडितीने दिल्याचा अरोप शिवसेना (ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी (दि.20) पत्रकार परिषदेत केला. चाकणकर फरार होण्यापूर्वी त्यांना अटक करावी, त्यांची नार्को टेस्ट करावी, नाशिक येथील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात आणि चाकणकर यांच्या दुरध्वनी संभाषणाची तपासणी करावी तसेच आर्थिक गुन्हे शाखेने चाकणकर यांच्या आर्थिक स्त्रोतांची चौकशी करावी, अशा काही मागण्याही अंधारे यांनी यावेळी केल्या .
जगात एपस्टिन फाईल्स आणि राज्यात कॅप्टन फाईल्स प्रकरण पुढे आले आहे, असेही अंधारे यांनी सांगितले.
चाकणकर यांना तंत्र -मंत्र विद्या अवगत होती, अशी माहिती एका पिडीतीने दिली आहे. चाकणकर यांनी 2 सप्टेंबर 2024 मधील सोमवती अवस्येला स्वत:ची अनामिकाही कापली होती चाकणकर यांच्या अनामिकेला बँडेज असल्याची छायाचित्रेही अंधारे यांनी दाखवली. चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरात यांच्या मुलाच्या लग्नातही चाकणकर उपस्थित होत्या. चाकणकर यांच्या घरात खरात यांची भाची वास्तव्यास आहे, असा अरोप अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना चाकणकर यांनी महिलांना न्याय देण्याऐवजी खरात यांना वाचविण्याा प्रयत्न केला. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्या का बोलत नाहीत, हा प्रश्न आहे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. राज्य महिला अयोग पदाचा दुरुपयोग करून त्यांनी अनेकांवर दबाव टाकला होता. त्यामुळे त्यांना फरार होण्यापूर्वी अटक झाली पाहिजे.
दरम्यान, अशोक खरात आणि चाकणकर यांचे दुरध्वनीवर किती वेळा संभाषण झाले, यासाठी सीडीआर तपासले पाहिजेत, खरात यांना वाचविण्यासाठी चाकणकर यांनी कोणा कोणाला दूरध्वनी केले होते, याची चौकशी झाली पाहिजे तसेच चाकणकर यांच्या आर्थिक स्त्रोतांचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी व्हावी. त्यांची नर्को टेस्ट करावी, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.
अंजली दमानिया संतप्त : महाराष्ट्रामध्ये एक नाव खूप चर्चेत आहे, कॅप्टन खरात..त्याला भोंदू बाबा नाव दिलं आहे.. माध्यमांना विनंती आहे की त्याला विकृत बाबा नाव द्या. शेकडो महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले आहे. महाराष्ट्राचा एपस्टिन फाईल याला म्हणता येईल. सुषमा अंधारे यांची आत्ताच पत्रकार परिषद झाली. अनेक राजकीय पक्षाचे नेते त्यांना भेटले आहेत. श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी, ओशनो प्रे करायला लावायचे. ओम इशनेश्वराय नम: हे जप 11 वेळा करायला सांगायचे, यावेळी महादेवाच्या पिंडीवरचा हंडा हलायाचा आणि प्रश्न विचारायला लावायचे. सिद्ध प्रेय यामध्ये होम हवन केले जायचे. त्यात अनेकांना वेगवेगळ्या आकृत्या दिसायच्या, आवाज यायचे, यामुळे लोक हिप्मोसिस व्हायचे यामध्ये अनेकांचे लैंगिक शोषण झालं. खूप गोष्टी आहे जे मी सगळं लिहून घेतल्या आहेत. मुंबईत कार्यरत असलेले डीप्यूटी कलेक्टर खरात यांना पैसे पुरवतात, अगदी वकील सुद्धा देतात, व्हीएसआर सोबत खरात यांचे सुद्धा फोटो आहे. सावकारी करून जमिनी खरात हडप करायचां असही दमानिया म्हणाल्या.
पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या की, साई सिल्वर नावाचे मंगल कार्यालय शिर्डी येथे आहे. त्याने खरातचे पैसे दिले नाही म्हणून मंगल कार्यालय त्याने हडप केले. विकास दिवटे नावाचा प्रकरण झालं होतं ते दाबवण्यात आलं, आता ही फाईल ओपन करावी. त्याच्या घरी 13 किलो सोनं आहे. गावाची यादी आहे ज्यामध्ये जमिनी खरातच्या नावावर आहेत. सिन्नर, नाशिक पाथर्डी,शिर्डी येथे त्याच्या जमिनी आहेत. मी सदानंद दाते यांना सगळे कागदपत्रे देणार आहे. आता आषाढी एकादशी झाली, ज्यांना पांडुरंग दर्शन झालं नाही, त्यांनी खरातचं दर्शन घ्याव असं रुपाली चाकणकर म्हणतात. रुपाली चाकणकर तुम्ही थर्ड क्लास आहात, येत्या 24 तासाच्या आत मुख्यमंत्री यांनी राजीनामा घेतला नाही तर मी आवाहन करेल राज्यातील संपूर्ण महिलांना तारीख आणि वेळ ठरवू महिला नेत्यांना सुद्ध सांगेल या विरोधा ठिय्या आंदोलन करू, हे मी जाहीर करते, असं म्हणत दमानिया यांनी संताप व्यक्त केला.
काही राजकारीण सल्ला घ्यायला जायचे. तर काही नेते ओशनो जल घ्यायचे. तिरुपती बालाजीचे ट्रस्टी तर हे ओशनो जल घ्यायला हेलिकॉप्टरने घ्यायला यायचे. अनेक टॉपचे लिडर त्यात आहेत जे भेटी गाठी घ्यायचे. रुपाली चाकणकर यांना का वाचवलं जातय? एवढं प्रकरण आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना वाचवताय, आज जर मुख्यमंत्री,गृहमंत्री यावर काही बोलले नाही , तर मी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना म्हणणार नाही. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या बडतर्फ करा, फरार असतील तर त्यांना पाताळातून शोधून काढा चौकशी करा त्यांची, अटक करा त्यांना हे खुलासे मी करत राहील. आज, उद्या, सोमवारी मी हे खुलासे करत राहील असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे.



Comments