top of page

मत मागायला आमच्यादारात या दांडके काढू- हाके

हा कुत्रा बघ कसा तुझ्या ढुं...ला चावतोय, गेवराईत रॅली शक्तिप्रदर्शन

ree

ओबीसी नेते लक्ष्मण हाके समर्थक आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये बीडच्या गेवराईमध्ये 26 ऑगस्ट रोजी राडा झाला होता. गेवराई पोलिसांनी हाके यांच्यासह 14 लोकांवर गुन्हा दाखल केला याप्रकरणी गेवराई पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या नोटीसीला न जुमानता आज लक्ष्मण हाके यांनी गेवराईत शक्तिप्रदर्शनाने दंड थोपटत ‘ आता मत मागायला आमच्या दारात या दांडके काढू’ असा इशारा दिला.


लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये 26 ऑगस्ट रोजी झालेल्या जोरदार राड्या नंतर आज लक्ष्मण हाकेंनी गेवराईतून दंड थोपटत विजयसिंह पंडित यांना इशारा दिला आहे. हाके यांना पोलिसांनी गेवराईमध्ये येण्यास रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाके समर्थकांसह गेवराई शहरात ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शक्तिप्रदर्शनाने रॅली काढली.


हाके यांनी रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार विजयसिंह पंडित यांना डिवचले. पापड्या आमदार म्हणत हाके यांनी थेट असंविधानीक भाषेत विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. सभेनी रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका करताना ‘हा कुत्रा बघ कसा तुझ्या ढुंगणाचा चावा घेतो’ अशा असंविधानीक भाषेत टीका केली. यावेळी नवनाथ वाघमारे, बळीराम खटके आदी उपस्थित होते.

Comments


bottom of page