मतदनापूर्वी नवी मुंबईत पाचशे च्या नोटांनी भरलेली बॅग आढळली खारघरमधील प्रकार, पाकीटामध्ये भरलेल्या अढळल्या पाचशेच्या नोटा
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

मुबई: निवडणुक हा लोकशाहीचा उत्सव आहे, याच लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचे महापात महापालिका निवडणुकीत घडत असल्याचे आनेक उदाहरणं समोर येत आहेत. राज्यातील 29 महापालिका निवडणुक मतदनाला काही तास आवधी उरला आहे. नामनिर्देशनपत्र सादर करण्यापासून मागे घेण्याची प्रक्रिया असो वा प्रचार या सगळ्या प्रक्रियेत नियमांची ऐशी तैशी दिसून आली.
अगदी जाहिर प्रचारातून आरोप- प्रत्यारोपांसह उमेदवारांच्या भाषेची ढासळलेली पातळी. पण आता त्याहूनही भयंकर कृत्य समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुक मतदनाच्या काही तास अगोदर खारघरमध्ये नोटांनी भरलेली बॅग अढळून आली आहे. मुंबईसह उपनगरातील बहूतांश ठिकाणी महापालिका निवडणुकीसाठी पैसे वाटल्याचे प्रकार समोर आले आहेत. मतदारांना प्रभावीत करण्यासाठी उमेदवारांकडून जिकडे तिकडे पैशांचाा पाऊस पडत आहे.
नवी मुंबईच्या खारघर परिसरात पैशानी भरलेली बॅग अढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सेक्टर 20 मध्ये ही बॅग सापडली आहे. या बॅगमधून आणलेले पैसे मतदारांना देण्यासाठी असल्याच संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे पैसे पाकीटांमध्ये भरलेले आहेत. या प्रकरणात खारघर पोलिस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बॅगमधून पाकीटांमध्ये आणलेले पैसे कोणत्या पक्षाचे, कोणत्या उमेदवाराचे याबाबत अद्याप काही ठोस माहिती मिळू शकली नाही. पोलिसा ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅगमध्ये पाचशे-पाचशेच्या नोटा पाकीटात भरलेल्या सापडल्या असल्या तरी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रचार पत्रक किंवा इतर कागदपत्रे सापडलेली नाहीत.



Comments