मनसे मेळावा: राज ठाकरेंनी सत्ताधार्यांवर तोफ डागली
- Navnath Yewale
- 7 days ago
- 2 min read
..तो पर्यंत राज्यात निवडणुका घेवूनच दाखवा, बाहेरुन मते आणल्याची जाहिर कबुली देत आहेत.

मनसेचा आज मुंबईतील गोरेगाव येथे मेळावा होत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा होत आहे. मतदारयाद्यांमधील घोळ, निवडणुकीची तयारी आदी मुद्यांवर ते पदाधिकार्यांशी संवाद साधत आहेत.
मतदान यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. जे मतदान होईल, ते खरं होईल, याच दृष्टीने निवडणुका झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. सर्वांनी मतदारयाद्यातील मतदारांची पडताळणी करा, कोण कुठे राहतंय, किती जण राहतात, हे शोधा. प्रत्येक घरात जाऊन, सर्वच पक्षांनी हे तपासले पाहिजे. हे स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. मतदारयाद्या स्वच्छ व्हायला हव्यात. आधीच पाच वर्षे गेली आहेत. आणखी एक वर्षे जाऊ द्या. असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ठाणे जिल्हा हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून हे सगळं चाललं आहे. बुलेट ट्रेनला याचसाठी विरोध केला होता. वाढवण बंदर, विमानतळ येतेय. हे कशासाठी? ह्यांचा प्लॅन काय तो लक्षात ठेवा. मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स कमी करून नव्या विमानतळावर नेण्यात येईल. कार्गो वाढवणला नेण्यात येईल. आदानी, अंबानी, गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हालाही बघणार नाहीत. शहरे आदानी, अंबानीला आंदण म्हणून देण्याचा प्लॅन आहे. सगळे अदानीला दिले जात असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधार्यांवर जोरदार निशाना साधला ते म्हणाले की, व्यासपीठावरून मतदारांचा अपमान करत आहेत. 20 हजार मते बाहेरुन आणल्याचे त्यांचेच नेते म्हणत आहेत. पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीर कार्यक्रमात हे कबुल केले. मी 20 हजार मतदार बाहेरुन आणल्याचे सांगताच शिंदेंनी त्यांना डोळा मारला. आणि त्यावर भुमरे यांनी सारवा सारव केली, हा काय प्रकार आहे. आमदार सतिश चव्हाण, संजय गायकवाड, आणि मंदा म्हात्रे यांचे व्हिडीओ त्यांनी मेळाव्यात दाखविले. मतदारयाद्यांमधील घेाळाबाबत भाष्य केले. हे व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी सत्ताधार्यांवर निशाणा साधला



Comments