top of page

मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं लवकरच लाव रे तो व्हिडिओ! बिनविरोध विजयी उमेदवारांच्या विरोधात पुरावे, कोर्टात जाण्याचा जाधव यांचा इशारा


मुंबई: राज्यातील 29 महानगरपालीका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज मागे घ्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखेारांची नाराजी दूर करून त्यांची मनधरणी करणे प्रत्येक पक्षासमोर आव्हान होते. त्यात भाजपाने अनेक नाराजांची समजूत काढण्यास यश मिळवले. शिवाय अपक्ष आणि प्रमुख विरोधी पक्षांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात महायुतीचे 65 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. आता या उमेदवारांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे या उमेदवारांविरोधात पुरावे असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे आता कोर्टात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे ठाणे, कल्याण- डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या 65 महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात पुरावे आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची पोलखोल करणार आहेत.


काल उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी नेत्यांनी कॉल करून दबाव आणल्याचा दावा केला आहे. याबाबत कॉल रेकॉर्ड, व्हिडिओ यांच्यासह अनेक महत्वाचे पुरावे राज ठाकरे यांच्याकडे नेत्यांनी सुपूर्त केले आहेत. येत्या सोमवारी या 65 बिनविरोध उमेदवार आणि त्यांच्या जागांबाबत कोर्टात जाणार आहेत. याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. “ उद्या निवडणूक आयुक्त यांची भेट घेणार आहे. आम्ही ज्या 65 उमेदवारांच्या ठिकाणी ज्या घटना घडल्या आहेत. त्याची माहिती देणार आहोत. सोमवारी आम्ही कोर्टात जाणार आहोत. नगरसेवकांविरोधात कोर्टात जाणार, आधी आम्ही पत्रव्यवहार करणार असल्याचंही जाधव म्हणाले.

Comments


bottom of page