top of page

मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट, खरिप पेरणीचा वेग मंदावला! पावसाची दडी, शेतकरी हवालदील; 65 % पेरणी, लाखमोलाचं बी-बीयाणं मातीत?

बीड : मराठवाड्यात यंदाच्या खरिप हंगामातील परेणीची स्थिती दिवसें दिवस अधिक चिंताजनक बनत आहे. जुलै महिना अर्धा संपवत आला असतानाही विभागात केवळ 65 % पेरणी पूर्ण झाली आहे. पवावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांत शेतकरी अद्याप पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच दिवशी 45.58 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा मात्र केवळ 32.15 लाख हेक्टर क्षेतावर झाली आहे. सर्वाधिक पेरणी नांदेड जिल्ह्यात 78% झाली असून लातूर 43%, धाराशिव 48%, बीड 62% एवढी झाली आहे जी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.


मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अल्पपावसामुळे मराठवाड्यातील लाखो हेक्टरावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या भागात पेरण्या झाल्या त्या भागातील पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या आहेत, तर अनेक ठिकाणच्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे आसमानी संकट घोंगावत आहे. लाख मोलाचे जूनच्या शेवट्या आठवड्यात पेरणी योग्य ओल नसतना पावसाच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी लाख मोलाचे खत बियाणांची पेरणी केली. पेरणी पश्चात पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील पेरणी क्षेत्रात बीयाणांची उगवनच झाली नाही, तर ज्या पिकांची उगवन झाली त्या पिकांनी उपयुक्त पावसाअभावी माना टाकल्या आहेत. पावसाची दडी, उन आणि त्यातच सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेतातील ओलावा गोठत असून पिकांना आता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

पेरणीपूर्व नांगरणी, वखरणीसह उन्हाळी मशागत मोलाने,त्यातच यंदा खत, बीयावणाचे भाव गगनाला भिडेलेले असताना रिन काढून खरिपाची पेरणी केली. मुला- बाळांच्या शिक्षणासह कौटुंबीक अर्थिक संकटांवर पडदा टाकून कशीबसी पेरणी केली, पुरेशा पावसाअभावी उगवण झाली नाही, तर बहुतांश ठिकाच्या क्षेत्रावरील पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या, याशिवाय गवन क्षमतेतील पिके पाण्याअभावी कोमेजून जात आहेत. त्यामुळे आधिच महागाईशी दोन हात करणारा शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने हवालदील झाला आहे.


मरठवाड्यात खरिप पेरणी केवळ 65 टक्केच

सरासरी पेरणी क्षेत्र: 49 लाख 72 हजार 729 हेक्टर

प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र: 32 लाख 15 हजार 255 हेक्टर

मागील वर्षी याच कालावधीत पेरणी क्षेत्र: 45 लाख 58 हजार 415 हेक्टर



छत्रपती संभाजीनगर विभाग पेरणी : 67%

छत्रपती संभाजीनगर: 70% , जालना :70%

लातूर विभाग पेरणी : 63 %

परभणी :70 %, नांदेड (आघाडीवर): 78%, हिंगोली : 76 %, धारशिव: 48 %, लातूर (सर्वात पिछाडीवर) 43%


पावसाची प्रतिक्षा कायम: मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम असून जूलै महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. 13 जुलैपर्यंत विभागात सरासरी केवळ 163 .7 मिमी पाऊस झाला असूनतो सरासरीच्या 77.2 टक्के इतकाच आहे. जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामाच्या तुलनेत आतपार्यंत केवळ 24.1 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे खरीप पिकांसह शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. जिल्हानिहाय पहिल्यास जालना जिल्ह्यात सर्वाधिक 214.9 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या 106.2 टक्के आहे. तर लातूरमध्ये केवळ 119.4 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या 55.8 टक्के इतकाच आहे. नांदेड ,परभणी, बीड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.


मराठवाड्यातील जिल्हानिहाय पावसाची नोंद

छत्रपती संभाजीनगर 184.9 मिमी(97.8%)

जालना: 214.5 मिमी(82.7%)

बीड: 150.5 मिमी (82.7%)

लातूर: 119.4 मिमी(55.8%)

धाराशिव :156.2 मिमी(84.7%)

नांदेड : 171.4 मिमी (66.5%)

परभणी : 133.3 मिमी (56.2%)

हिंगोली: 181.0 मिमी(68.1%)


मराठवाड्यातील अपेक्षीत पावसाची स्थिती

मराठवाड्यात अपेक्षित पाऊस : 212.1 मिमी

प्रत्यक्ष पाऊस : 163. 7 मिमी

सराराच्या तुलनेत : 77.2%

पावसाची तूट : 22.8 %


मारठवाड्यात पावसाची मोठी तूट

मराठवाड्यात पावसाची 22.8% तूट; जूलै अर्धा संपूनही समाधानकारक पाऊस नाही 13 जूलैपर्यंत विभागात केवळ 163.7 मिमी (77.2%)पावसाची नोंद लातूरमध्ये सर्वात कमी 119.4 मिमी पाऊस; खरीप हंगामाबाबत शेतकर्‍यांची चिंता वाढली


कृषी विभागाचा शेतकर्‍यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर विभागात जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. एकून पेरणी योग्य क्षेत्र 21 लाख 47 हजार हेक्टर आहे. त्याच्यापैकी आज रोजी 14 लाख 32 हजार हेक्टर पेरणी झाली आहे. आता पावसाचा खंड पडला आणि घराच्या विकासाच्या पुढील चार-पाच दिवस पाऊस पडेल असा वेध शाळेचा अंदाज नाही, ज्या शेतकर्‍यवांच्या जमिनी चांगल्या आहेत त्यांनी आंतरमशागत मात्र ज्या जमिनी हलक्या आहेत त्या शेतकर्‍यांनी सावध राहण्याची गरज आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे ते पाण्याचा चांगल्चया पद्धतीने उपायोग करून पिक कशा पद्धतीनरे याचा विचार केला पाहिजे , असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले. आज दुबार परेणीची माझ्याकडे काही अहवाल नाही, भविष्यातील चार-पाच दिवस आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. मागच्या वर्षी हलक्या जमिनीवर सोयाबीन आणि कापूस या पिका संदर्भात आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे, असा इशारा सुनील वानखेडे यांनी दिला.


दुबार पेरणीची ऐपत नाही:

पंधरा दिवसापूर्वी चार सहा बोटं ओलीवर पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन पेरलं, पंन्नास दाण्यातून चार-दोन दाणे उगवले. पावसाअभावी उगवन न झाल्याने शेतात आल्यावर पोटात आग पडत होती, शेवटी आऊत घातलं. आधिच पंन्नस हजारापर्यंत बी-बीयाने, खत उधारीवर आनलं पिकावर ते पैसे द्याचे आहेत. पण आता दुबार पेरणीसाठी खत बीयानाची ऐपतच नाही.
सुभाष हारिभाऊ फरतारे

जन्नेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड


Comments


bottom of page