मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह टीमचे मानले आभार
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 2 min read

संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदाा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आमा मरठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे आभार मानले आहेत.
जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे मानले आभार: मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की, 30 मे चे आंदोलन झाल्यापासून राज्य सरकारने जी भूमीका घेतली, ती खरंच चांगली आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकायला येतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेष करून विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी या सगळ्यांनी मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत. त्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचा ठरवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आज देखील मुख्यमंत्र्यांनी मराठा आणि कुणबी मंत्रालयासाठी मान्यता दिल. त्याचा सुद्धा प्रोसिंडिंग आपल्याकडे त्याचा ड्राप्ट दिला आहे. ओबीसी प्रमाणे सगळ्या सवलती, सारथी मधल्या योजना, महामंडळामध्ये योजना, ज्या काही बंद हेात्या, त्या सुरू करण्याचा निर्णय आज सरकाने केला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला, उदय सामंत यांनी सुद्धा एमआयडीसीचा निर्णय घेतला.
मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही-जरांगे पाटील: जरांगे पाटील म्हणाले की, आता या योजना बंद होऊ देऊ नका यावर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवा, जे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याचे सुद्धा आदेश दिले. याचे सुद्धा आभार आम्ही मानतो. 58 लाख नोंदीची यादी आम्ही मागितली, ती सुद्धा सरकार द्यायला तयार आहे. मी मनापासून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. या मागण्याना जास्तीत जास्त अंमलबजावणीकडे नेण्याचे काम खरंच विखे पाटील यांनी केलं. नुसत्या मान्यता द्यायच्या आणि मंजुरी द्यायची आणि पुढं काहीच व्हायचं नाही, असं करू नका. अशाच पद्धतीने तुम्ही मराठा समाजातील गोरगरीब लेकरांचं कल्याण करा, हा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही असंम्हणत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह टीमचे आभार मानले.



Comments