महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? - लक्ष्मण हाके
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 1 min read

राज्य सरकाने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे, आता ओबीसी विद्यार्थ्याप्रमाणेच मरठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळणार आहेत. शैक्षणिक सह इतर महत्वाच्या बाबींसाठी या सवलती असणार आहेत. ओबीसींप्रमाणेच मरठा समाजासाठी तब्बल8 योजना सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील मरठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का? - हाके: मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करण्याचा निर्णय सरकाने घेतला आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी सुमदायातील योजनांना निधी नाही, ओबीसी महामंडळांना अध्यक्ष नाही. समाज कल्याण विभागाचा हजारो कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवला जातो. ओबीसी समुदायातील 18 महामंडळाची घोषणा निवडणुकीला सामोरं जाताना सरकारने केली होती. पण त्या 18 महामंडळाला साधा अध्यक्षही नाही आणि निध सुद्धा नाही, कार्यालय नाही आणि शिपाई पण नाही.
महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?
महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी विद्यार्थ्यांना काही सवलती देणार असला तर त्याचं स्वागत लक्ष्मण हाके करणार आहे. पण महाज्योतीला जो निधी मिळतो तो सार्थीच्या तुलनेत किती मिळतो असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. आठ लाख करोड रुपयांच्या बजेटमध्ये 50 % हून अधिक जास्त लोकसंख्येला म्हणजे ओबीसीला अर्धा टक्याची बजेटची तरतुद असावी. फडणवीस साहेब तुम्ही 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात, परंतु ओबीसींच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्यात. मराठा समाजाच्या वेगवेळ्या मागण्यांना तुम्ही रेड कॉर्पेट आजही घालता. आम्हाला आजही तुम्ही सापत्न वागणूक देत आहात. आजही तुम्ही एससी एसटी आणि ओबीसी बांधवांवर अत्याय करत आहात, तुमच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर निशाना साधला.



Comments