फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; ओबीसींना मिळणार्या शैक्षणिक सवलती मरठा समाजालाही लागू 8 योजनांचा जिआर निघाला..
- Navnath Yewale
- 10 hours ago
- 2 min read

मुंबई: नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजासाठीच्या आठ शैक्षणिक सवलतींच्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर यापुढील काळात ओबसींसाठी सुरू करण्यात येणार्या शैक्षणिक सवलतींच्या योजना आपोआप समाजालाही लागू होणार आहेत.
महाराष्ट्र सरकारने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयामध्ये ओबीसींच्या आठ शैक्षणिक सवलती व सोयी- सुविधा देणार्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू होतील. संबंधित विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश सरकाने दिले आहे.
या आहेत योजना: राज्यात इतर मागास वर्ग प्रवर्गास लागू असलेली “ शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना ” मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात यावी. , इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षक योजना, नियोजन विभागाने सारथी संस्थेमार्फत राबविण्यात यावी, इतर मागास वर्ग प्रवर्गातील प्राथमिक व उच्च माध्यामिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्याना देखील लागू करण्यात यावी.
इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांना लगू असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिण संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठीची योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना कौशल्य, रोजगार,उद्योजगकता आणि नाविन्यता विकास विभागाने राबवावी, अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असेलेल्या इतर 16 बाबींबातची प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागने करावी, राज्यातील रहीवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी लागू असलेली योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू करण्याबाबची कार्यवाही संबंधित विभागने करावी. 7 इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असतील.
विद्यार्थ्यांनी केंद्रित प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या इतर मागस वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक सवलती लागू करणत याव्यात.
अशा एकूण आठ योजनांचा शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. नमुद करणत आलेल्या योजनांव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी- सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील, असे सरकाने स्पष्ट केले आहे. या तरतूदी चालू शैक्षणिक वर्षापासून (2026-27) पासून लागू होतील.



Comments