top of page

मराठा तरुणीं विषयी अक्षेपार्ह वक्तव्य: संताप, निषेध अटकेची मागणी; संतप्त युवकांनी घराच्या गेटला लटवल्या साडी,बांगड्या

Aug 20
2 min read

बीड: ओबीसी नेते नवनाथ वाघामरे यांनी पुण्यात एका माध्यमाशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखल देत मराठा तरुणींबद्दल संतापजनक अक्षेपार्ह वक्तव्य केले. नवनाथ वाघमारे यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा मराठा समाजातून तिव्र निषेध करण्यात येत आहे. ठिकठिकाणी महिलांनी निषेध व्यक्त करत अटकेची मागणी केली. सोलापूर येथील मराठा सेवक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांच्या जालना येथील घरासमोर साडी, बांगड्या लटवून इशारा दिला. एकीकडे निषेध आणि संताप व्यक्त होत असतानाच आता नवनाथ वाघमारेच्या समर्थनार्थ महिलाच पुढे आल्या आहेत.


मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाबाबदार धरत त्यांच्यावर गंभीर व्यंगात्मक टीका केली. प्रत्यक्षात ज्या वेळेस जरांगे आरक्षणाची मागणी करतात त्या वेळेस त्यांच्या मागणीच्या विरोधात ‘ओबीसी आरक्षण बचाव’ ची हाक देत ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे प्रतिकार करतात, असे चित्र पाहावयास मिळते.


मंत्री बावनकुळे यांनी जरांगे यांच्या टिकेला उत्तर देताना “ माझी पत्नी कुणबी, सून मराठा असली तरी आम्ही कधी जातीयतेवर भाष्य करत नाहीत” असं म्हटलं होतं. मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्याचा धागा पकडून नवनाथ वाघमारे यांनी थेट मराठा तरुणींविषी संतापजनक अक्षेपार्ह व्यक्तव्य केले. नवनाथ वाघमारे म्हणाले की, “ कालच मंत्री बावनकुळे म्हणाले माझी पत्नी कुणबी, सून मराठा आहे. बावनकुळेंच्या घरात सगे सोयरे घुसले असतील. असं त्यांच्या बाबतीतच नाही तर कित्तेक ओबींसच्या नेत्यांबाबत असं आहे. ओबीसी आमदार, खासदारांचे गोंडस, सुंदर मुले,पैसा दिसला की मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात” नवनाथ वाघमारेंच्या संतापजनक अक्षेपार्ह वक्तव्याचा मराठा समाजातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.पुणे, सोलापूर, लातूर, धारशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी महिलांकडून निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी यांना अटकेचे निवेदन दिले. शिवाय पुण्यातील मराठा सेवकाने नवनाथ वाघमारे यांना धडा शिकवणार्‍यास दहा लाखाचे बक्षिसही जाहिर केले.


वाघामरेंच्या वक्तव्याचा सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच मंगळवारी (दि.18) बीडच्या गेवराईमध्ये ओबीसी संवादसभेदरम्यान नवनाथ वाघमारे यांची मिरवणूक काढण्यात आली. यावरून जरांगे पाटीलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी नवनाथ वाघमारे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना त्यांची पोलिस बंदोबस्तात मिरवणूक काढण्यावर आक्षेप घेत सरकारवर गंभीर आरोप केले.


सोलापूर येथील मराठा सेवक महेश डोंगरे यांनी आवाहन करत जालना येथील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या बंद घराच्या गेटला साडी आणि बांगड्या लटवत वाघमारे यांना धडा शिवकवण्याचा इशारा दिला. दरम्यान, मनोज जरांगे मुख्यमंत्र्यासह छगन भुजबळ, परळीतील मुंडे बंधू-भगिणी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वैयक्तीक टिका करत आहेत. कित्तेवेहा अक्षेपार्ह वक्तव्य करत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत आगोदर जरांगेना माफी मागायला लावा मग आम्ही माफी मागू अस विधान करत नवनाथ वाघमारे यांनी आपल्या वक्तव्यावर पुसटसी दिलगीरी व्यक्त केली.


नवनाथ वाघामरेच्या समर्थनार्थ सरसावल्या महिला : संताप्त मराठा समाजातून वाघामरे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे. जरांगे पाटील व्यक्तिश: मंत्री आंमदारांवर टीका करत आहेत, त्यांनी अद्यापर्यंत कुठल्याही समाजाच्या माहिला मुलींवर अक्षेपार्ह विधान केलं नाही, मंत्री, आमदार, खासदारांवरील वैयक्तिक टिकेचा ‘बदला’ समाजावर घेण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही अशा संतप्त भावना मराठा संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत.


मराठा सेवक यांच्या वाघमारे यांच्या घरासमोरील निषेधानंतर बुधवारी (दि.19) जालन्यात वाघमारे यांच्या समर्थनार्थ महिलांनी वाघमारेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत महेश डोंगरे यांना इशारा दिल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page