..मराठे गप्प बसत नाहीत आता,कामं बंद करतोत आम्ही; खेटायचंच आहे तुला आता!
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read
मिळविलेला जीआर रद्द करता थोडी तरी लाज वाटली पाहिजे मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर काय उठायचं आपून. मोर्चात, रस्त्यावर, कोर्टात कुठंही खेटू, चालूदे वर्षभर आम्हाला कायदा सुव्यवस्था बिगडवायची नाही जरांगे पाटील मंत्री भुजबळांवर संतापले

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनादरम्यान सरकारने मराठा समाजास ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. जीआरनुसार प्रशासकीय यंत्रणा कामालाही लागली त्यानुसार मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाकडून कार्यशाळा संपन्न होत आहेत. मात्र, दूसरीकडे सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी संघटना, नेते यांच्याकडून रान उठवले जात आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी काल ओबीसी उपसमितीच्या बैठकीत सरकारच्या जीआरला कडाडून विरोध करत सरकारने जीआरमध्ये दूरुस्ती करावी अन्यथा रद्द करावा अन्यथा न्यायालयीन लढाईचा इशारा दिला. मंत्री छगन भुजबळ यांनी जीआर मध्ये काही बदल सुचवले आहेत. तसे आठ पानांचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेवर आज मनोज जरांगे यांचा संताप पहावयास मिळाला. माध्यमांवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आरे मिळविलेला जीआर रद्द करायला निघाला भुजबळ थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. मराठे गप्प बसत नाहीत आता, तुला खेटायचंच आहे आता. तुम्हाला मोर्चात, रस्त्यात, कोर्टात खेटायचं आहेत आम्हीपण खेटणार आहोत. चलू दे वर्षभर आता. आम्ही पण कागदपत्रांची जुळवा जूळव करतोय आता असं म्हणत जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला.


Comments