मराठ्यानंतर ओबीसींची मुंबईला धडक?; दसर्यानंतर महामोर्चाचे आयोजन
- Navnath Yewale
- Sep 11
- 2 min read

ऐन गणेशात्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. या आदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाला होता. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आठ पैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयानंतर पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदेालन मागे घेत समाधान व्यक्त केले होते. मात्र, सरकारच्या या जीआरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. विशेष: मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचाा इशारा दिला आहे. आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे.
दरम्यान मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक पवित्र्यात आहे. दसर्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटना नेत्यांची ऑनलाइन बैठक होणार असून, यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे.
मराठा समाजाला दिल्या जाणार्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमिवर दसर्यानंतर भव्य मोर्चाचे आयोजन केले जात आहे. 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मोर्चा पार पाडण्याचा प्रस्ताव असून, आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ देखील या बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान हैदराबाद गॅझेटिरच्या अंमलबजावणीला मान्यता देणार्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच, याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसेच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी अंतरिम मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या वतिने महनोहर धोंडे यांनी तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे.
याचिकेपूर्वी कॅव्हेट दाखल
सकरारच्या हैदराबाद गॅझेटिअरच्या निर्णया विरोधात याचिका दाखल होण्यापूर्वी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात मराठा समन्वयक, तथा मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधन काळकुटे यांच्यासह अॅड. राजेसाहेब पाटील यांनी व्हेट दाखल केले आहे. त्यामुळे कोर्टाला निर्णयापूर्वी मराठा समाजाची बाजू ——ऐकून घ्यावी लागणार आहे.



Comments