महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगर यांचा धक्कादायक दावा
- Navnath Yewale
- Jul 21
- 1 min read

महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगर यांनी आज पुन्हा धक्कादायक खुलासा केला आहे. महादेव मुंडे यांच्या हत्तेवळी एक व्यक्ती घटनास्थळावर उपस्थित होता. त्या व्यक्तीस पोलिसांनी ठाण्यात बोलावून ‘ तु कशाला यात पडतो, तुला काय करायचं ’ असं म्हणून त्यास ठाण्यातून हुसकावले. त्यानंतर काही दिवसातच वाल्मीक च्या गँगने त्याचाही खून केल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
परळी (जि.बीड) येथील महादेव मुंडे यांची 18 महिण्यापूर्वी तहसील कार्यालयासमोर धारदार शस्त्राने हल्ला करून क्रूर हत्या करण्यात आली होती. महादेव मुंडे यांच्या मारेकर्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. तपासाल गती मिळून न्यायमिळावा यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञाणेश्वरी मुुंडे यांनी सातत्याने प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचबरोबर पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी उपोषण केले होते. प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी एसआयटी नेमण्याचे अश्वासन देण्यात आले होते. मात्र, तपासाला गती मिळत नसल्याचा आरोप करत ज्ञाणेश्वरी मुंडे यांनी आत्मदहणाचा इशारा दिला होता. त्यानुसार मागील आठवड्यात पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करत आत्महत्यचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती बाळा बांगर यांच्या धक्कादायक खुलाशाने. मागील महिण्यात बाळा बांगर यांनी पत्रकारपरिषदेद्वारे वाल्मीक कराड याच्याकडून आपला कसा छळ झाला. सत्तेच्या जोरावर प्रशासकिय यंत्रणा हाताशी धरुन आपल्यासह कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यासह महादेव मुंडे यांच्या हत्तेविषयी धक्कादायक खुलास करत आरोपींची नावे सांगितली. याशिवाय महादेव मुंडे यांना मारल्यानंतर दहशतीसाठी मारेकर्यांनी महादेव मुंडे यांच्या मानेच्या मांसाचा तुकडा वाल्मीक कराड समोर टेबलवर ठेवण्यात आल्याचा खुलासही बाळा बांगर यांनी केला होता. दरम्यान, बाळा बांगर प्रसारमाध्यमा संमोर बोलताना म्हणाले की, महादेव मुंडे यांना मराताना एक प्रत्यक्षदर्शी व्यक्ती होती. त्यास परळी पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले आणि ‘तु या भानगडीत पडू नकोस , तुला काय करायचं’ असं म्हणत त्यास सोडून दिले. त्यानंतर काही दिवसांनी वाल्मीक गँगने त्या व्यक्तीचाही खून केल्याचा धक्कादायक दावा बाळा बांगर यांनी केला आहे.



Comments