महापालिकेतही ‘भाजप’च बाहूबली: मुंबई ठाकरेंच्या हातून निसटली, महापालिकेवर महायुतीची सत्ता
- Navnath Yewale
- Jan 16
- 4 min read

मुुंबई: महापालिका (इचउ) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला आहे. मागील 25 वर्षे सत्तेत बसलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई मकहापालिका निवडणुकीत भाजप (88) शिवसेना - णइढ (73), शिवसेना शिंदे गट (29) काँग्रेस 18 आणि मनसे (10) जागांवर आघाडीवंर आहे. इचउ चा निकाल हा भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीच्या बाजूने लागल्याने उद्धव ठाकरेंना गड राखण्यात अपयश आलं आहे. मुंबईतील ‘ मराठी माणुस’ हा मुद्दा ठकारेंनी उचलून धरला होता. परंतु, आता या निवडणुकीत ठाकरे पराभूत झाल्याने त्यांच्या समोर कोणते पर्याय असणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
काँग्रेसने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत शिवसेना- मनसे युतीची घोषणा केली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला. पण या निवडणुकीत शिवसेना णइढ ला अपेक्षीत यश मिळालं नाही.
दरम्यान, मुंबई महापालिकेची सत्ता जाणे हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी मोठा धक्का आहे. मागील दोन दशकांपासून बीएमसीवर शिवसेनेचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवसेनेचा नेहमीच बीएमसीवर दबदबा राहिला आहे. मित्रपक्षांसोबत युती करून शिवसेना बीएमसीवर सत्तेत येत होती.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर मुंबईतील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. परंतु, या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जास्त जागा जिंकून शिंदेंना झटका दिला. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचीच शिवसेना खरी असल्याचा कौल या निवडणुकीत दिला आहे.
राज ठाकरेंच्या मनसेचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला आहे. मनसे फक्त 10 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीचा विस्तार करणं उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असणार आहे. ‘ मी मुंबईकर’ सारखे अनेक चळवळी उद्धव ठाकरेंनी राबवल्या आहेत. त्यामुळे ते शिवसेनेचा विस्तार बाहेरही करण्याची शक्यता आहे.
वसई विरार मध्ये ठाकुर यांचा किल्ला अभेद्यच, भाजपची जोरदार मुसंडी: वसई- विरार महानगरपालिका निवडणुीच्या निकालांनी आज, शुक्रवार (दि.16) पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांच्या बहूजन विकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध केले आहे. विधानसभेच्या पराभवानंतर ही निवडणुक ठाकूर यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात होती. त्यानुसार एकून 115 पैकी बहुजन विकास आघाडीने 71 जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या निकालामुळे वसई-विरारमध्ये ठाकूर यांचा ‘किंगमेकर’ म्हणून असलेला दबदबा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने 115 पैकी 44 जागांवर विजय मिळवत मुख्य विरोधी पक्षाची जागा घेतली आहे. दुसरीकडे ठाकरे आणि शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही. यामध्ये बविआ ने 113 भाजपने 95 तर ठाकरे गटाने 89 जागा लढवल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची एकहाती सत्ता: एमआयएमची मुसंडी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 58 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. एमआयएमने जोरदार मुसंडी मारत तब्बल 33 जागांवर विजय मिळवून प्रमुख विरोधी पक्षाची जबाबदारी काबीज केली आहे. पालकमंत्री असलेल्या शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकली नाही. उलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. आता महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक पक्ष तोही भाजप सत्ता स्थापन करणार आहे. तर एमआयएम प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल.
छत्रपती संभाजीगरच्या एकून 115 जागांपैकी भाजप 58 शिवसेना (शिंदे) 12, शिवसेना (उबाठा) 6, एमआयएम 33, काँग्रेस 1, राष्ट्रवादी (श.प) 1, वंचित बहूजन आघाडी 4
पुणे महापालिकेवर भाजपचा झेंडा : पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत शहरावर आपली सत्ता अधिक मजबूत केली आहे. मतमोजणी अद्याप काही प्रभागांत सुरू असली तरी बहुतांश जागांवरील निकाल स्पष्ट झाले असून पुण्याच्या महापालिकेवर भाजपचाच झेडा फडकल्याचे पहायला मिळत आहे. आत्तापर्यंतच्या निकालानुसार भाजपने तब्बल 83 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 21, काँग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले असून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला एकही जागा मिळालेली नाही.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपचा दणदणीत विजय
राष्ट्रवादी पुन्हा विरोधी बाकावर
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत 128 पैकी भारतीय जनता पक्षाचे तब्बल 85 उमेदवार विजयी झाले. भाजपने सलग दुसर्यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. तर, फेब्रूवारी 2017 ला हातातून निसलेली सत्ता ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप करत शहर पिंजून काढले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रवादीला पुन्हा नाबारले. एकूण 36 जागा राखलेल्या राष्ट्रवादीला सलग दुसर्यांदा विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे.
निवडणुकांमध्ये भाजपनं जवळपास 21 महानगरपालिकांवर विजयचा झेंडा फडकवला आहे. तर चंद्रपूर, वसई-विरार, मालेगाव, ठाणे, लातूर, भिवंडी, अमरावती, परभणी या महापालिकांमध्ये काँग्रेस एमआयएम, बहुजन विकास आघाडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी सत्ता मिळवली आहे. पण महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीच्या महापालिका विजयानंतर पहिलं ट्विट केलं आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट केलं आहे.
राज्यातील महापालिका निकालात राज्यात भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. अनेक महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमधून मोठं विधान केलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्यातील निकालावर पहिली प्रतिक्रिया समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमधून महाराष्ट्राचे आभार मानले आहे. तसेच राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी , महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणार्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोन ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा, असं मोदींनी म्हटलं आहे.
मोदी पुढे ट्विटमध्ये म्हणतात, आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे असंही ते म्हणाले.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महायुतीच्या राज्यातील दणदणीत विजयानंतर ट्विट करत अभिनंदन केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला मिळालेलं प्रचंड यश एक गोष्ट स्पष्ट करते. ती म्हणजे आज देशातल्या काना- कोपर्यातील जनतेचा विश्वास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील छऊअ सरकारच्या विकासाच्या धोरणावरच असल्याचं म्हटलं आहे.
याचदरम्यान, शाह यांनी हे ऐतिहासिक यश म्हणजे महाराष्ट्रातील महायुती सरकारने विकास आणि जनकल्याणाच्या केलेल्या कार्यांवर जनतेने उमटवलेली पसंतीची मोहोरच. या प्रचंड समर्थनाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे मनापासून आभार! त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपा- शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केलं आहे.



Comments