महाराष्ट्र पोलिसात खळबळ: 9 पोलिसांना सुनावण्यावत आली जन्मठेपेची शिक्षा
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

वाशिम: वशिम जिल्ह्यातील एका गाजलेल्या कोठडी मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षानंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत 9 पोलिस कर्मचार्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे संपूर्ण महाष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याच्या स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला.
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी महत्वपूर्ण निकाल सुनावला. रिसोड पोलिस ठाण्यात चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या बेगम पवार या तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. न्यायालयाने या प्रकरणीतील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा चिार करून दोषी पोलिस कर्मचार्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
बेग्या पवार हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावचे रहिवासी होते. ते पारधी समाजातील असून त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. 10 मे 2011 रोजी त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रकरणाचा तपास सुरू झज्ञला आणि अखेर प्रदिर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला.
या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरिक्षक महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सिताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या 9 पोलिस कर्मचार्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपासा सीआयडीकडे सापेवण्यात आला होता. सीआयडीने अवघ्या 34 दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा तसेच विशेष अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, अनेक वर्षाच्या न्यायलढ्याला अखेर यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



Comments