बीडमध्ये लाचखोरीचा कहर!, एकाच वेळी तीघे लाचखोर जालना एसीबीच्या जाळ्यात
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

बीड: जिल्ह्यातील प्रशासन सेवेत लाचखोरीने कहरच केला आहे. कोणतेही काम पैशाच्या वजना शिवाय होत नसल्याचं भयान वास्तव आहे. प्रशासकीय कार्यालयात कामाप्रमाणे पैशाची डिल होत असल्याचा प्रत्यय एसीबीच्या कारवायांनी समोर येत आहे. त्याची परिचिती मंगळवारी (दि.३०) जालना एसीबीने एकाच कारवाईत सहाकर विभागातील तीन लाचखोरांना रंगेहात पकडून आली आहे.
.
जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सावकारी परवाना देण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर १३ हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक निबंधक सूरज जगदाळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने त्यासोबतच खासगी इसम महेश फपाळ यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. माजलगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हा सापळा लावण्यात आला. या प्रकरणी तीघां लाचखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



Comments