top of page

महाराष्ट्र हळहळला : आईसह चार चिमुकल्यांना विषबाधा तीन चिमुकल्यांचा मृत्यू ; आई, एका बालिकेवर बुलढाण्यात उपचार सुरू

बुलढाणा: जिल्ह्यातून मन हेलावणारी ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाली, या दुर्दैवी घटनेत तीन चिमुल्या बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. आई व एका चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.


धाड (जि. बुलढाणा) येथील अफरीन मोहम्मद वसीम जमादार (वय 34) यांच्यासह त्यांच्या 4 मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले. कालपासून या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. आज सकाळी प्रकृती अधिक बिगाडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोन चिमुकल्यांचा तर सायंकाळी एका चिमुकलीचा मृत्यू झाला.


या दुर्दैवी घटनेत मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमादार (वय 4) मशिरा मोहम्मद वसीम जमादार (वय 7) आणि फातिमा माहेम्मद वसीम जमादार (वय 8) यांचा मृत्यू झाला आहे. तर आई अफरीन आणि मुलगी अश्मिरा वसीम जमादार (वय 3) यांच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments


bottom of page