top of page

महाराष्ट्र हादरला; एकाच कुटुंबीतील चार जणांची आत्महत्या मुलांचे मृतदेह रेल्वेस्थानकावर,आई-वडिलांचा राहत्या घरात गळफास

नांदेड: जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू ची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन तरुणांचे मृतदेह रेल्वे रूळावर तर त्यांच्याच आई-वडिलांंचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या आवस्थेत अढळून आले. एकाच कुटुंबातील दोन मुले, आई-वडिल एकून चार जणांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मुदखेड पोलिसांनी दोन्ही घटनाचे पंचनामे करून मृतदहे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत.


मुदखेड तालुक्यातील जवळा (मुर्‍हार) येथील रमेश होनाजी लखे वय 51 वर्षे, राधाबाई रमेश लखे वय 44 वर्षे, उमेश रमेश लखे वय 25 वर्षे (मुलागा), बजरंग रमेश लखे वय 22 वर्षे (मुलगा) रहीवाशी आहेत. आज गुरूवारी (दि. 25) उमेश व बजरंग या दोघा भावंडांचे मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रूळावर मृतदेह अढळून आले. दोघांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. दरम्यान, त्याच्या आई -वडिलांचे मृतदेह घरात संशयास्पद अवस्थेत अढळून आले आहेत. त्यामुळे आई-वडिलांचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, या बाबत संभ्रम आहे. घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूमागची कारणं, कौटुंबिक व आथिर्र्क परिस्थिती, तसेच अन्य कोणता ताण तणाव होता का? याचा सखोल तपास पोलिस करीत आहेत.


दरम्यान, एकाच कुटुंबातील पती पत्नींसह दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे जवळा (मुर्‍हार) गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही मुलांसह आई-वडिलांनी आत्महत्या की घातपात? तपासाचे नांदेड पोलिसांसमोर आव्हान आहे. मुलांनी रेल्वे रूळावर उड्या घेवून तर आई- वडिलांनी गळफास घेवून जीवनयात्रा संपवल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असले चार जणांनी टोकाचे पाऊल का उचलले? कौटुंबीक, आर्थिक, नैराश्य की आणखी वेगळं काही या सर्वबाजून पोलिसांनी तपास सुरू केला आहे पोलिस तपासातूनच खरा प्रकार समोर येणार आहे. मात्र, एकच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments


bottom of page