top of page

महाराष्ट्राचा अवमान करणार्‍यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही- आ. भास्कर जाधव

दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरही दरड कोसळल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून विरोधकांनी, नेटीझन्सने सत्ताधारी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना विरोधकांवर जोरदार पलटवार केला. तसेच एक कोटी खोटारडे मेल्यानंतर हे लोक पैदा झाले आहेत, असे म्हणत विरोधकांना टोला लागावला. तसेच माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करात तर कोणालाही सोडणार नाही, असा इशराही मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यावरुन विरोधकांनी पलटवार केला असून तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असे शिवसेनार आमदार भास्कर जाधव म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून दिलेल्या इशार्‍यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केल. मुख्यमंत्र्यांचे आपल्यावर खोटे बोलण्याचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं काँग्रेसचेे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर बोलतान सपकाळ म्हणाले की, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही असे कोण म्हणाले होते? काल नाशिमध्ये ढगफूटी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण ढगफुटी पाऊस झाला नाही, याचा अर्थ खोट कोण बोलतं, यावरून लक्षात येते, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.


दरम्यान शिवसेना (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनीही फडणवीसांना उत्तर दिले. एकेकाळी तुम्ही देखील विरोधी पक्षनेते होता, तेव्हा तुम्ही किती आरोप करत होता. कोविड काळात तुम्ही उद्धव ठाकरेंवर किती आरोप केले? सकाही आशिष शेलार, 11: 00 वाजता लाड-दरेकर, दुपारी 2 वाजता चंद्रकांत दादा, दुपारी 4 वाजता देवेंद्र फडणवीस स्वत: पत्रकार परिषद घेत होते तेव्हा तुम्ही बेछूट करत असलेले आरोप दिसले नाही का? असा सवालही भास्कर जाधव यांनी


पहाटेच्या शपथविधीने महाराष्ट्राचा सन्मान वाढवला का?- सुषमा अंधारे

मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात पटलावर कुत्ते, भाडे के टडू आणि तत्सम अतिय सभ्य आणि संसदीय शब्दांमध्ये मोठमोठ्याने दरडावून सांगितले की, महाराष्ट्राची बदनामी करू नका पहाटेचा शपथवधी किंवा ज्याना चक्की पिसायला लागेल म्हणाले आणि ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना हे त्याच सभागृहात पटलावर ऑन रेकॉर्ड सांगण्याचे कष्ट मुख्यमंत्री महोदय घेतील का? असा सवाल शिवसेना उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी केला.


मिसिंगलिंक ला अजितदादाचे नांव द्या- मिटकरी:

देवेंद्र फडणवीसजी मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) वर तोंडसुख घेणार्‍या विरोधकांना आज सभागृहात ऑन रेकॉर्ड सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बदं केल्याबद्दल प्रथमत: आपले मनापासून आभार. मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यामध्ये आपले व एकनाथ शिंदे यांचे योगदान जसे नाकारता येऊ शकत नाही तसेच आपल्या खांद्याला खांदा लावून युती सरकारमध्ये प्रमाणिक पणे या मिसिंग लिंक प्रकलप उभारणीत काम करणार्‍या अजित दादांना नाकारून चालणार नाही. आपण इतक्या लवकर दादांना कसे विसरू शकता? त्यांच यात काहीच योगदान नव्हतं का? आज सभागृहात दादांचे स्मरण झाले असते तर आम्ही कायम आपल्या चरणावर नतमस्तक झालो असतो. मात्र तसे झाले नाही, असे म्हणत मिटकरी यांनी सभागृहात अजित पवारांचा उल्लेख न झाल्याने नाराजी व्यक्त केली.

bottom of page