शरद पवारांची 30 वर्षानंतर विधिमंडळात एन्ट्री ; बेळगाव सीमा प्रश्नी उच्चस्तरीय बैठकीला उपस्थिती
- Navnath Yewale
- 22 hours ago
- 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद आज प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले. त्यांच्या स्वागातासाठी अनेक पोहोचले. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या विधानभवनातील कक्षात येऊन सदिच्छा भेट घेतली. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक संपल्यावर शरद पवार यांंनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. योवळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पवार साहेबांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बेळगाव सीमा प्रश्न विधीमंडळात आज उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. तत्पूर्वी विधानभवन परिसरात आगमन झाल्यानंतर शरद पवारांच्या स्वागतासाठी अनेक मंत्री आमदार पोहोचले.
अमदारांसोबत बैठक, रोहित पवारांची अनुपस्थिती:
दरम्यान, सीमा प्रश्नावर बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला 10 पैकी 9 आमदार उपस्थित होते. जवळपास अर्धा तास आमदारांसोबत बैठक पार पडली. मात्र, मुंबई असून देखील रोहित पवार बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय भूवया उंचावल्या. दुसरीकडे मुंबईत शिक्षकांचे आझाद मैदानात भर पावसात आंदोलन सुरू आहे. विधानभवनात शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू असताना दुसरीकउे आझाद मैदानातील शिक्षक आंदोलना राहित पवार यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरला. रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करत आपण शिक्षक आंदोलनाला उपस्थित राहणार आहोत. मात्र, शरद पवार विधिमंडळात येणार असल्याने आपण उशिरा आंदोलनस्थळी पोहचू असं म्हटलं होतं.