top of page

महाराष्ट्राचे राजकारण युती,आघाडी व्हाया हाय होल्टेज ड्रामा


नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारण पक्षप्रवेश, युती, आघाड्यांनी ढवळून निघाले असतानाच आज पुन्हा नाशिकमध्ये हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मोठा राडा झाला. विरोध असताना भाजपने ‘त्या’ पाच जणांचा पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिमध्ये भारतीय जनता पार्टीतीलवाद चव्हाट्यावर आला आहे.


महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेला धक्का देण्याची रणनीती भाजपने आखले आहे. ठाकरे पक्षाच्या दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेशावरून आज वाद झाला. या पक्षप्रवेशामुळे भाजपात नाराजी पसरली आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला. याशिवाय काँग्रेसच्या शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध होत आहे. त्यामुळे पक्षप्रवेशावरून भाजपात मोठं नाराजीनाट्य रंगलं आहे. याचे पडसाद भाजपा कार्यालयात फरांदे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गट आमनेसामने आल्यानं भाजप कार्यालयाला पोलिस छावणीचं स्वरूप आलं होतं.


कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांच्यासह पाच नेत्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला आहे. दरम्यान, पक्षप्रवेशामुळे कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ सुरू असताना नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

Comments


bottom of page